मुंबई- मालाड पूर्व कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरीपाडा विभागातून 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. जे रात्रीच्या अंधारात बँकेचे एटीएम लुटण्याच्या तयारीत होते. चोरांनी एटीएम लुटण्याआधीच कुरार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाच लुटेऱ्यांना पकडण्यात यशस्वी झाले. तीन आरोपी अजूनही फरार आहेत.
लुटीपासून वाचले ॲक्सिस बँक एटीएम; चोरीआधीच आरोपींना अटक - चोरांनी एटीएम लुटण्याआधीच कुरार पोलीस घटनास्थळी
रात्रीच्या अंधारात बँकेचे एटीएम लुटण्याच्या तयारीत होते. चोरांनी एटीएम लुटण्याआधीच कुरार पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पाच लुटेऱ्यांना पकडण्यात यशस्वी झाले. तीन आरोपी अजूनही फरार आहेत.

कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वसंत वेले यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मालाड पूर्व येथील पिंपरीपाडा विभागातील क्वीन मेरी शाळेच्या बाजूच्या ॲक्सिस बँकेचे एटीएम लुटण्याच्या मनसुब्याने काही आरोपी बाईकने सकाळी चार वाजता येणार असल्याची सूचना मिळाली होती. खबर मिळताच पहारा देत असताना पोलिसांच्या दोन पथकांनी जाळे विणून आठ चोर एटीएमच्या बाजूला गेले व पोलिसांनी पळत असताना त्यांना पकडले. आरोपींमध्ये सुबोध दीपक साळवी (26 वर्ष) सौरभ 23 वर्ष सिद्धेश इंगळे वीस वर्ष समीर खान बावीस वर्षाच्या समीर पार्टे 27 वर्ष आहेत.