महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माजी ऊर्जा मंत्र्यांचा नातेवाईक असल्याचे लाखो रुपयांची फसवणूक; आरोपीला साताऱ्यातून अटक - former energy minister

ऊर्जा विभागामध्ये नोकरी लावून देणाऱ्या तरुणाविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये काही महिन्यापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचा बनवा करून ऊर्जा विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपयाची फसवणूक करणाऱ्या तरुणाला दादर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ( claiming to be relative of former energy minister arrested in Satara )

Truck Auto Accident
ट्रक व ऑटोच्या भीषण अपघात

By

Published : Jul 19, 2022, 10:37 PM IST

मुंबई - माजी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा नातेवाईक असल्याचा बनवा करून ऊर्जा विभागात सरकारी नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून लाखो रुपयाची फसवणूक करणाऱ्या तरुणाला दादर पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी संदीप राऊत याला साताऱ्यातून अटक करण्यात आली आहे. आज न्यायालयासमोर हजर केले असता 25 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ( claiming to be relative of former energy minister arrested in Satara )

अनेक तरुणांची फसवणूक - ऊर्जा विभागामध्ये नोकरी लावून देणाऱ्या तरुणाविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये काही महिन्यापूर्वी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता या प्रकरणात अनेक तरुणांची फसवणूक झाली असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रँच युनिट 12 ला देण्यात आला होता.

फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे दाखल - याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँच युनिट 12 च्या पथकाने एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी विरोधात फसवणुकीचे दोन डझनहून अधिक गुन्हे मुंबईतच नव्हे तर महाराष्ट्रातील विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. संदीप कृष्णा राऊत असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने आतापर्यंत किती तरुणांची फसवणूक केली आणि एकूण किती रुपयांना चुना लावलाय याबाबत पोलीस त्याची चौकशी करत आहेत.

रबर स्टॅम्पसह अनेक वस्तू जप्त -गुन्हे शाखा युनिट 12 चे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी सांगितले की, आरोपीकडून बनावट नियुक्ती पत्र, ओळखपत्र, रबर स्टॅम्प, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र, दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला 25 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा - गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने आतापर्यंत शेकडो तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवले आहे. तर या आरोपीचा ऊर्जामंत्री नितीन राउत यांच्याशी काहीही संबंध नाही आणि कोणाचाही संबंध नाही आहे. संदीप राऊत असे आरोपीचे नाव असून तो सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहे. मुंबईतील गेस्ट हाऊसमध्ये राहून तो उर्जा विभागात सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने महाराष्ट्रभरातील तरुणांना गंडा घालायचा. लाखो रुपये घेऊन आरोपी संदिप फरार झाला होता.

हेही वाचा -उच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान वाजला फोन; खंडपीठाने पक्षकाराला मोबाईल जप्तीसह ठोठवला दंड

ABOUT THE AUTHOR

...view details