मुंबई -1993 बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम गाझी ( Salim Qazi Death Death In Karachi ) याचा कराचीत मृत्यू झाला आहे. डॉन छोटा शकीलचा जवळचा म्हटला जाणारा सलीम गाझी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होता. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा ( Salim Qazi Death By Heart Attack ) मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
दाऊद इब्राहिम गेला होता पळून -
गाझी हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा मुख्य गुन्हेगार होता. जो हल्ल्यानंतर दाऊद इब्राहिम आणि इतर साथीदारांसह पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तो सतत आपला ठावठिकाणा बदलत असे. तो दुबईतही राहिला होता आणि त्यानंतर पाकिस्तानमधील छोटा शकीलच्या बेकायदेशीर कारवायांमध्ये सक्रिय भूमिका बजावत होता. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ते उच्च रक्तदाब आणि इतर आजारांनी त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र, शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. माहितीसाठी सांगतो की, मुंबई बॉम्बस्फोटात सलीम गाझीशिवाय छोटा शकील, दाऊद इब्राहिम, टायगर मेनन आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग होता. त्या हल्ल्यात सुमारे 250 लोक मारले गेले आणि 600 हून अधिक जखमी झाले. सध्या हे सर्वजण कराची किंवा यूएईमध्ये लपले आहेत.