महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fake Playboy Job : प्लेबॉय म्हणून काम देण्याचे आमिष दाखवून दीड लाखांची फसवणूक; आरोपीला दिल्लीतून अटक - Fake Playboy Job

ऑनलाइन पद्धतीने आरोपीने पीडित तरुणाची 1 लाख 53 हजारांची फसवणूक केली ( cheating by offering playboy job ) आहे. तरुणाकडून माटुंगा पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ( Fake playboy job alert ) केला. या प्रकरणी आरोपीला राज पार्क पोलिस स्टेशन, नांगलोई, नवी दिल्ली येथून अटक केरण्यात आली ( Mantuga police arrest accused in Delhi ) आहे.

माटुंगा पोलीस ठाणे
माटुंगा पोलीस ठाणे

By

Published : Jan 17, 2022, 4:39 PM IST

मुंबई - मुंबईतील तरुणाला देहव्यापार सेवा पुरविणाऱ्या वेबसाईटसाठी प्लेबॉय म्हणून काम करण्याचे आमिष दाखवून फसवणूक ( cheating by offering playboy job ) करण्यात आली. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी आरोपीला दिल्लीमधून अटक केली आहे. रोहित कुमार असे आरोपीचे नाव आहे.

ऑनलाइन पद्धतीने आरोपीने पीडित तरुणाची 1 लाख 53 हजारांची फसवणूक केली आहे. तरुणाकडून माटुंगा पोलिस स्थानकात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. या प्रकरणी आरोपीला राज पार्क पोलिस स्टेशन, नांगलोई, नवी दिल्ली येथून अटक केरण्यात आली ( Mantuga police arrest accused in Delhi ) आहे.

हेही वाचा-Punjab Assembly Election 2022 : पंजाब विधानसभा निवडणूक आता 20 फेब्रुवारीला होणार

तरुणाने घेतली माटुंगा पोलिसात धाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार दादर पूर्व येथे राहतो. 12 डिसेंबर रोजी इंटरनेटवर सर्फिंग करत असताना त्याला लोकांटो या वेबसाईटवर प्लेबॉय म्हणून नोकरीची संधी ( Fake playboy job alert ) दिसली. संकेतस्थळावर त्याला एक मोबाईल क्रमांकही सापडला. आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी वेबसाईटसाठी काम करणारे कर्मचारी असल्याचे भासवून तरुणाला नोकरीची ऑफर दिली होती. आरोपींनी तक्रारदाराला विविध मोबाईल नंबरवरुन फोन करून महिला असल्याचे भासवले. हॉटेल बुकिंग, निरोध, स्पेशल टॅक्सी सेवेच्या नावाखाली आरोपींनी पीडित तरुणाकडून पेटीएमद्वारे तीन हप्त्यांमध्ये 1 लाख 53 हजार रुपये उकळल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने माटुंगा पोलिसात धाव घेतली.
हेही वाचा-OBC Reservation : सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणावरील सुनावणी होणार बुधवारी; मतदान मात्र होणार मंगळवारी

आरोपींनी अनेकांना फसविल्याचा संशय-

माटुंगा पोलिसांनी रोहित कुमारला कुर्ला न्यायालयात आज सोमवार रोजी हजर ( Mantuga police action on cheating case ) केले. न्यायालयाने त्याला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. माटुंगा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की आरोपी रोहित कुमारने देशातील विविध राज्यात अनेकांना फसवले आहे. हे प्राथमिक तपासात दिसून येत आहे. माटुंगा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल, लॅपटॉप आणि दोन डेबिट कार्ड जप्त केले आहेत.
हेही वाचा-Reaction of Celebrity : महाराष्ट्राचा आवाज हरपला; मुख्यमंत्र्यांसह विविध मान्यवरांची प्रा. एन. डी. पाटील यांना श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details