महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आग्रीपाडा परिसरात 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक - आग्रीपाडा अल्पवयीन मुलगी लैंगिक अत्याचार

मुंबईतील आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर 38 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडून पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : May 22, 2022, 6:52 AM IST

मुंबई -मुंबईतील आग्रीपाडा परिसरात राहणाऱ्या आठ वर्षीय मुलीवर 38 वर्षीय व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांकडून पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा -Today Petrol Diesel Rates : पेट्रोल स्वस्त होणार मात्र, 'या' जिल्ह्यात सव्वा रुपयाने पेट्रोल महागले, पहा आजचे पेट्रोल, डिझेलचे दर

पीडित मुलगी आपल्या आजीसोबत आग्रीपाडा येथे रहाते. चिमुरडी आईस्क्रीम आणण्यासाठी इमारतीखाली आली होती. ही संधी साधून 38 वर्षीय आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. बराच वेळ होऊनही नात घरी न परतल्याने आजीने तिचा शोध घेतला. त्यावेळी ती चिमुरडी परिसरातील गणराज इमारतीखाली शांत उभी असल्याचे आजीला दिसले. आजीने मुलीला घरी नेत विचारपूस केली असता ती जोराने रडू लागली. यावरून आजीला काही तरी अनुचित घडल्याचा संशय आला. आजी आणि शेजारच्यांनी त्या मुलीला विश्वासात घेतले असता परिसरात राहणाऱ्या व्यक्तीने अत्याचार केल्याची माहिती तिने दिली.

आजीने पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करत काही तासांच्या आत 38 वर्षीय आरोपीस अटक केली. आरोपीवर याआधी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पीडित मुलीची नायर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघडकीस आले. या प्रकरणात पुढील तपास आग्रीपाडा पोलीस करत आहेत.

हेही वाचा -Chandrakant Patil On Excise Duty Reduction : 'उद्धव साहेब आता तरी पेट्रोल-डिझेलवराच VAT कमी करा'

ABOUT THE AUTHOR

...view details