महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार, आरोपीला अटक - Dindoshi

मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

Accused arrested for raping minor girl  Dindoshi in Mumbai
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार, आरोपीला अटक

By

Published : Nov 24, 2021, 10:31 AM IST

मुंबई - मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्यात 16 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार (Rape) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंवि कलम 363, 373 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

याप्रकरणी दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले की, काल गुन्हा दाखल केल्यानंतर रात्री आरोपीला अटक करण्यात आली, आज आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी तरुणीच्या जबाबावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपी आणि पीडित हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details