महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

विमानामध्ये अभिनेत्रीचा विनयभंग, व्यावसायिक आरोपीला अटक - molesting actress

अभिनेत्री दिल्लीहून मुंबईला जात होती. अभिनेत्री आणि आरोपी इंडिगो एअरलाईन फ्लाइट क्रमांक 6E6387 वरून मुंबईत येत होते. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर पोहोचले. तेव्हा पीडित अभिनेत्री तिची बॅग घेण्यासाठी सीटवरून उठली. त्यावेळी ही घटना घडली असल्याचे सांगत अभिनेत्रीने क्रू मेंबरकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.

विमान
विमान

By

Published : Oct 20, 2021, 1:52 PM IST

मुंबई - मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात अभिनेत्रीसोबत विनयभंगाचे प्रकरण समोर आले आहे. अभिनेत्रीच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपी व्यावसायिकाविरोधात भादंविच्या कलम 354,354 (B) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. आरोपी नितीन बन्सल यूपीच्या गाझियाबादचा रहिवासी असल्याची माहिती आहे.

ही घटना घडली जेव्हा अभिनेत्री दिल्लीहून मुंबईला जात होती. अभिनेत्री आणि आरोपी इंडिगो एअरलाईन फ्लाइट क्रमांक 6E6387 वरून मुंबईत येत होते. जेव्हा विमान मुंबई विमानतळावर पोहोचले. तेव्हा पीडित अभिनेत्री तिची बॅग घेण्यासाठी सीटवरून उठली. त्यावेळी ही घटना घडली असल्याचे सांगत अभिनेत्रीने क्रू मेंबरकडे तक्रार केली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. दरम्यान न्यायालयाने आरोपीला उद्यापर्यंत कोठडी सुनावली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details