महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

खून करून कानपूरला फरार झालेल्या आरोपीला 30 तासात अटक - मुंबई पोलीस आरोपी अटक कानपूर

23 फेब्रुवारीला दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मकवाना कंपाऊंडमध्ये एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

murder
खून करून कानपूरला फरार झालेल्या आरोपीला 30 तासात अटक

By

Published : Feb 26, 2020, 4:57 PM IST

मुंबई- 23 फेब्रुवारीला दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मकवाना कंपाऊंडमध्ये एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदनानंतर या व्यक्तीच्या डोक्यावर दगडाने वार करून खून केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात तपास करत कानपूर येथून बिंदू शर्मा या आरोपीला केवळ 30 तासांच्या आत अटक केली आहे.

खून करून कानपूरला फरार झालेल्या आरोपीला 30 तासात अटक

दरम्यान, 23 फेब्रुवारीला दहिसर मकवाना कंपाऊंड येथे पानाची टपरी चालवणाऱ्या अशोक मोर्या(37) हा व्यक्ती रात्री 12 च्या सुमारास त्याच्या पत्नीसोबत फोनवरून बोलत होता. या वेळी दारूच्या नशेत असलेल्या बिंदू शर्मा या आरोपीने मृत अशोककडे येऊन त्याला दमदाटी करत त्याच्या जवळील मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकवण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपी व मृत व्यक्तीमध्ये झटापट झाली होती. दारूच्या नशेत असलेला आरोपी बिंदू याने दगडाने अशोकच्या डोक्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. या दरम्यान अशोक मोर्या हा जखमी झाल्याने खाली कोसळला असता आरोपीने त्याचा मोबाईल फोन व पैसे घेऊन फरार झाला होता.

डायमंड ग्लास दुर्बीणने आरोपीचा लागला छडा

घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांना एक डायमंड हिऱ्यांना पैलू पाडण्यासाठी वापरण्यात येणारी ग्लास दुर्बीण आढळून आली. मकवाना कंपाऊंडमध्ये हिऱ्याला पैलू पाडणारे कारखाने असल्याने पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज घेऊन प्रत्येक कारखान्यात कामगारांची चौकशी सुरू केली. या दरम्यान सीसीटीव्हीत आढळून आलेल्या आरोपीच्या चेहऱ्यावरील जखमा या एका कारखान्यातील कामागाराशी जुळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, तो 24 फेब्रुवारीला सिएसएमटी येथून पुष्पक एक्सप्रेसने कानपूरला फरार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कानपूर रेल्वे स्थानक गाठून आरोपीला अटक केली आहे.

हेही वाचा -

गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची सूत्रे आता सामाजिक न्याय विभागाकडे

भाजपचा एल्गार : शेतकरी, महिला सुरक्षतेबाबत सरकार अपयशी; भाजपचे राज्यव्यापी धरणे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details