मुंबई - 2021 मध्ये देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असल्याची धक्कादायक माहिती एनसीआरबीच्या Maharashtra ranks top three suicide cases अहवालातून उघडकीस आले आहे. आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. भारतभर अशा 1 लाख 64 हजार 33 प्रकरणांची नोंद झाली आहे. NCRB च्या अहवालानुसार, गेल्या वर्षी देशात सर्वाधिक 22 हजार 207 आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या.
NCRB Report 2021 देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात, एनसीआरबीच्या अहवालातून धक्कादायक माहिती - देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात
देशात सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असल्याची धक्कादायक माहिती एनसीआरबीच्या Maharashtra ranks top three suicide cases अहवालातून उघडकीस आले आहे. आत्महत्येच्या बाबतीत तामिळनाडू आणि मध्य प्रदेश दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
NCRB
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अलीकडील अहवालानुसार, व्यवसाय किंवा करिअरशी संबंधित समस्या, एकाकीपणाची भावना, अत्याचार, हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, दारूचे व्यसन आणि आर्थिक नुकसान ही आत्महत्यांच्या घटनांची मुख्य कारणे आहेत.