मुंबई- सीएसएमटी स्थानकात आज दुपारी 2.25 वाजताच्या सुमारास लोकल बफरला धडकल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही.
मुंबई: सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली - Mumbai local
आज दुपारी 2.25 वाजताच्या सुमारास लोकल बफरला धडकल्याची घटना मुंबईतील सीएसएमटी स्थानकात घडली. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून याबाबत अधिक माहिती घेत असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.
![मुंबई: सीएसएमटी स्थानकात लोकल बफरला धडकली](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-4289280-thumbnail-3x2-mumbai.jpg)
लोकल बफरला धडकली
मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक 3 वर धीमी लोकल येत असताना लोकल पुढे असलेल्या बफरला धडकली. यापूर्वीही सीएसएमटी व चर्चगेट स्थानकात लोकल बफरला धडकल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनेत कोणीही जखमी झाले नसून याबाबत अधिक माहिती घेत असल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून सांगण्यात आले.