महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

उताराला लागलेल्या गाडीचा अपघात अटळ, संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका - Accident of Fadanvis vehicle on sloppy road is inevitable

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीत घेतलेल्या सभेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांनी त्यांच्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अनेक आरोपांवरून निशाणा साधला. आता फडणवीस यांना शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून फडणवीस यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिलीय.

उताराला लागलेल्या गाडीचा अपघात अटळ आहे, संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका
उताराला लागलेल्या गाडीचा अपघात अटळ आहे, संजय राऊत यांची फडणवीस यांच्यावर टीका

By

Published : May 16, 2022, 8:57 AM IST

Updated : May 16, 2022, 9:03 AM IST

मुंबई -देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत येणार आहे असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीत घेतलेल्या सभेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गोरेगावमध्ये सभा घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. फडणवीस यांनी त्यांच्या सभेतून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या अनेक आरोपांवरून निशाणा साधला. आता फडणवीस यांना शिवसेनेनं उत्तर दिलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरवरून फडणवीस यांच्या भाषणावर प्रतिक्रिया दिलीय.

काय म्हणाले राऊत -शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका करताना म्हटलं की, "उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्ष नेता यांना ब्रेक लागणे कठीण असते. अपघात अटळ आहे." फडणवीस यांनी राज्यात पुन्हा सत्तेत येणार असं त्यांच्या भाषणात म्हटलं होतं. त्याच बरोबर मुंबई महानगर पालिकेवर यंदा त्यांचा महापौर बसेल असेही सांगितले आहे. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे.

मुख्यमंत्र्यांनी अगोदर घेतला समाचार -मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई, बीकेसी मधील सभेत राज्यातील पहाटेचा शपथविधी, बाबरी प्रकरण, हिंदुत्त्व, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान अशा मुद्द्यांवरून भाजपवर घणाघाती टीका केली होती. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या शारीरिक वजनावरून्ही त्यांना लक्ष केले होते. या टीकेला काल देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या सभेत सडेतोड उत्तर देताना अनेक आरोप केले आहेत.
धूर्त तर कोल्हा असतो -मुख्यमंत्र्यांच्या या सभेची खिल्ली उडवताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काल मुख्यमंत्र्यांची मुंबईत सभा झाली. यात काही तेजस्वी ओजस्वी ऐकायला मिळेल असं वाटलं होतं मात्र अख्खी सभा संपली तरी लाफ्टर थांबेना. शंभर सभांची बाप सभा असेल असं शिवसेना म्हणत होती. पण कालची सभा मास्टर सभा नव्हे तर लाफ्टर सभा होती. वाघाचे फोटो काढून कुणी वाघ होत नसतं. बाळासाबे खरे वाघ होते. तुम्ही म्हणालात ते खरंय बाळासाहेब साधेभोळे होते आणि आपण धुर्त आहात. धुर्त तर कोल्हा असतो अशा शब्दा फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. बाबरी पाडण्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की,"आज माझे वजन १०२ किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन १२८ किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही. तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत येणार आहे."
Last Updated : May 16, 2022, 9:03 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details