मुंबई -अंधेरीत मेट्रो-३ च्या टनेल बोअरिंगच्या खोदकामादरम्यान दगडाचा भाग कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. या अपघातात एक कामगार जखमी झाला आहे. या कामगाराला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मेट्रो - 3 च्या खोदकामा दरम्यान अपघात, एका कामगाराचा मृत्यू - मुंबई मेट्रो बातमी
अंधेरीत मेट्रो-३ च्या टनेल बोअरिंगच्या खोदकामादरम्यान अपघात झाला. या अपघातात एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर एक जण जखमी आहे.
मेट्रो 3 च्या खोदकामा दरम्यान अपघात
अंधेरी सीप्ज येथील सारीपुत नगर जवळ मेट्रो ३ कारशेड प्रकल्पाच्या टनलचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शुक्रवारी रात्री टनलच्या भुयारी मार्गातील दगडाचे खोदकाम मशीनद्वारे काम सुरू असताना अचानक एक मोठा दगड खोदकाम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर कोसळला. या अपघातात एका कामगराचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा कामगार जखमी झाला आहे. त्याला सेव्हन हिल रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आला आहे.