महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा, न्यायालयाचे पालिकेला निर्देश, उमेदवारीचा मार्ग मोकळा - राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा

ऋतुजा लटके यांचा अर्ज मंजूर लटके यांचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा असे न्यायालयानेे पालिकेला निर्देश दिले. ऋतुजा लटके यांच्या याविरोधात गंभीर तक्रारी आल्या आहेत. म्हणून अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही असे पालिकेने आज कोर्टात सांगितले. मात्र कोर्टाने लटके यांची बाजू ग्राह्य मानली.

ऋतुजा लटके
ऋतुजा लटके

By

Published : Oct 13, 2022, 3:25 PM IST

Updated : Oct 13, 2022, 5:01 PM IST

मुंबई - ऋतुजा लटके यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे. लटके यांचा राजीनामा उद्या 11 वाजेपर्यंत मंजूर करावा असे न्यायालयाने पालिकेला निर्देश दिले. आज कोर्टात या प्रकरणी जोरदार युक्तीवाद झाला. त्यानंतर कोर्टाने हा निर्णय दिला.

काय झाला युक्तीवाद - ऋतुजा लटके यांच्या याविरोधात गंभीर तक्रारी आल्या आहेत. म्हणून अद्याप राजीनामा मंजूर केलेला नाही असे पालिकेने आज कोर्टात सांगितले. या भ्रष्टाचाराच्या तक्रारी आहेत असेही पालिकेच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले. ऑक्टोबर महिन्यात दाखल तक्रार प्रलंबित असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. अंधेरीच्या एका व्यक्तीची तक्रार असल्याची माहितीही देण्यात आली. त्यावर ऋतुजा लटके यांचे वकील विश्वजित सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. निवडणूक लढू न देण्यासाठी म्हणून प्रशासनावर राजकीय दबाव असल्याचा त्यांनी आरोप केला.

राजीनामा पालिकेने अजून मंजूर केलेला नाही -दुसरीकडे ऋतुजा लटके यांचा राजीनामा पालिकेने अजून मंजूर केलेला नाही. राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्याचे म्हणणे आणि प्रशासनाकडे असलेली माहिती यांची पडताळणी केली जाते. एक महिना कालावधीत याबाबत चौकशी केल्यानंतर राजीनाम्याबाबत प्रशासन निर्णय घेते. त्यांचे अधिकृत राजीनामा पत्र 3 ऑक्टोबरला मिळाले आहे. त्यात दाखल एका तक्रारीची पडताळणी अद्याप बाकी आहे. बीएमसीचे वकील अनिल साखरे यांनी ही माहिती कोर्टाला दिली. ऋतुजा लटके यांनी राजीनामा पाठवला असला तरी त्यांनी काहीही संवाद प्रशासनाशी केला नाही. 3 ऑक्टोबरला राजीनामा दिला. त्यानंतर 12 ऑक्टोबरला ऋतुजा यांच्या विरोधात एक व्यक्तीने तक्रार केली आहे असे साखरे म्हणाले.

आयुक्तांचा विशेषाधिकार -नोटीस कालावधी माफ करून राजीनामा स्वीकारायचा की राजीनामा नाकारायचा हा सर्वस्वी पालिका आयुक्तांचा विशेषाधिकार आहे. या प्रकरणात राजीनामा पत्रही सदोष आहे. शिवाय आता तक्रार आली आहे. तर त्याचीही शहानिशा करून ते प्रकरण आधी बंद करावे लागेल. त्यानंतरच राजीनाम्याबाबत निर्णय घेतला जाईल. असे वकिलांनी स्पष्ट केले.

कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समान असावा -ऋतुजा लटके यांचे वकील वकील विश्वजित सावंत यांनी बीएमसीच्या वकिलांच्या दाव्यांवर आपला जोरदार युक्तीवाद केला. हेमांगी वरळीकर यांचा राजीनामा पालिका प्रशासनाने मंजूर केला होता. तेव्हाही कालावधी अत्यंत कमी होता. कायदा सर्व कर्मचाऱ्यांना समान असावा असे ते म्हणाले. हेमांगी यांना वेगळा आणी ऋजुता यांना वेगळा न्याय का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. केवळ राजकीय दबाव असल्याने राजीनामा मंजूर केला जात नाही असा आरोप त्यांनी केला. आता ही नवीन तक्रार आली आहे असे सांगण्यात येत आरहे. त्यामध्ये तक्रारदार अंधेरीचा आणि त्याचा वकील पनवेलचा आहे. यामागील कारणे खरी मानायची का, असेही ते म्हणालेत.

Last Updated : Oct 13, 2022, 5:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details