मुंबई -कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आल्याने आणि लसीकरण झालेल्या प्रवाशांची सख्या वाढल्याने मध्य रेल्वेने ठाणे-वाशी-पनवेल मार्गावर 7 सप्टेंबरपासून 16 एसी लोकल पूर्वरत करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
'अशा' धावणार एसी लोकल
मध्य रेल्वे दिलेल्या माहितीनुसार, या 16 एसी लोकल फेऱ्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत धावणार असून शनिवारी या लोकलच्या वेळेवर नॉन-एसी लोकल धावतील. रविवारी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सायंकाळी 5.46ची ठाणे-नेरूळ आणि सायंकाळी 5.54 नेरूळ-ठाणे या दोन लोकल वगळता इतर गाड्या धावणार नाहीत. तर, या दोन गाड्या रविवारच्या वेळापत्रकानुसार नॉन-एसी रेकसह धावतील. या सेवांच्या सुरुवातीसह, ट्रान्स-हार्बर विभागावरील उपनगरीय सेवांची एकूण संख्या सध्याच्या 246वरून 262पर्यंत वाढेल आणि मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांची एकूण संख्या सध्याच्या 1, 686 वरून 1,702पर्यंत वाढेल. प्रवाशांनी लोकलमध्ये चढताना आणि उतरताना रेल्वे प्रवास करताना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.
'असे' आहे एसी लोकलचे वेळापत्रक
- पनवेल सकाळी 5.44
- ठाणे सकाळी 6.36
- ठाणे सकाळी 6.46
- नेरूळ सकाळी 7.16
- नेरूळ सकाळी 7.29
- ठाणे सकाळी 8.00
- ठाणे सकाळी 8.08
- वाशी सकाळी 8.37
- वाशी सकाळी 8.45
- ठाणे सकाळी 9.14
- ठाणे सकाळी 9.19
- नेरूळ सकाळी 9.49
- नेरूळ सकाळी 9.57
- ठाणे सकाळी 10.27