मुंबई -केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी एसी लोकलच्या तिकीट दरात ५० टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर रेल्वेने एसी लोकलबरोबर साध्या लोकल ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्याचे तिकिट भाडे सुद्धा कमी केले आहे. या तिकीट भाडे कपातीची ५ में २०२२ पासून होणार आहे.
गुरुवारपासून एसी लोकलचे दर होणार कमी; असे असणार नवीन तिकीट दर ! - मुंबई एसी लोकलचे दर होणार कमी
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर गेल्या महिन्यात ३४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, या वातानुकूलित लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने या एसी लोकल प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. या एसी लोकलचे तिकिट काढणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात होती.
फर्स्ट क्लास डब्याच्या दैनंदिन तिकीटात कपात -मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर गेल्या महिन्यात ३४ वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. मात्र, या वातानुकूलित लोकलचे भाडे सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने या एसी लोकल प्रवाशांनी पाठ फिरवली आहे. या एसी लोकलचे तिकिट काढणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे एसी लोकलचे तिकिट दर कमी करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. याची दाखल घेऊन उपनगरीय रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एसी लोकल आणि सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लास डब्याच्या दैनंदिन तिकीटात कपात करण्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांनी केली. आणि पश्चिम रेल्वेवरील सामान्य लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्याचे तिकीट दर कमी झाले आहे. 10 किमीसाठी 25 रुपये झाले आहे. तर, 130 किमीच्या प्रवासासाठी 255 रुपयांऐवजी 150 रुपये आकारले जाणार आहे. तर, एसी लोकलच्या प्रवासासाठी 330 रुपयांऐवजी 165 रुपये आकारले जाणार आहेत.
असे आहे आता नवीन दर -
- कल्याण ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 165 रुपयांऐवजी 100 रुपये; तर, एसी लोकलचे 210 वरून 105 रुपये तिकीट
- डोंबिवली ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 160 रुपयांऐवजी 95 रुपये; तर, एसी लोकलचे 205 वरून 105 रुपये तिकीट
- दिवा ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 150 रुपयांऐवजी 90 रुपये; तर, एसी लोकलचे 190 वरून 100 रुपये तिकीट
- ठाणे ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपयांऐवजी 85 रुपये; तर, एसी लोकलचे 180 वरून 95 रुपये तिकीट
- मुलुंड ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपयांऐवजी 85 रुपये; तर, एसी लोकलचे 180 वरून 95 रुपये तिकीट
- घाटकोपर ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 105 रुपयांऐवजी 60 रुपये; तर, एसी लोकलचे 135 वरून 70 रुपये तिकीट
- कुर्ला ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 105 रुपयांऐवजी 60 रुपये; तर, एसी लोकलचे 135 वरून 70 रुपये तिकीट
- दादर ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 50 रुपयांऐवजी 25 रुपये; तर, एसी लोकलचे 65 वरून 35 रुपये तिकीट
- भायखळा ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 50 रुपयांऐवजी 25 रुपये; तर, एसी लोकलचे 65 वरून 35 रुपये तिकीट
- पनवेल ते सीएसएमटी फर्स्ट क्लासचे तिकीट 185 रुपयांऐवजी 105 रुपये; तर, एसी लोकलचे 240 वरून 120 रुपये तिकीट
- विरार ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 170 रुपयांऐवजी 100 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 220 रुपयांऐवजी 115 रुपये तिकीट
- नालासोपारा ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 170 रुपयांऐवजी 100 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 220 रुपयांऐवजी 115 रुपये तिकीट
- वसई रोड ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 165 रुपयांऐवजी 100 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 210 रुपयांऐवजी 105 रुपये तिकीट
- भाईंदर ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 150 रुपयांऐवजी 90 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 190 रुपयांऐवजी 100 रुपये तिकीट
- बोरिवली ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपयांऐवजी 60 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 180 रुपयांऐवजी 95 रुपये तिकीट
- अंधेरी ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 105 रुपयांऐवजी 60 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 135 रुपयांऐवजी 70 रुपये तिकीट
- वांद्रे ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 70 रुपयांऐवजी 40 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 90 रुपयांऐवजी 50 रुपये तिकीट
- दादर ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 70 रुपयांऐवजी 40 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 90 रुपयांऐवजी 50 रुपये तिकीट
- मुंबई सेंट्रल ते चर्चगेट फर्स्ट क्लासचे तिकीट 50 रुपयांऐवजी 25 रुपये; तर, एसी लोकलचे तिकीट 65 रुपयांऐवजी 35 रुपये तिकीट