मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) इतर छोटे पक्ष, अपक्ष कोणाला मत देणार याबाबत संभ्रम असताना समाजवादी पार्टीने (SP Support MVA) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे आमदार अबू आझमी (Abu Azmi MVA Vote) यांनी यावेळी सांगितले. विधान भवनात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.
Abu Azmi Support MVA : महाविकास आघाडीला पाठिंबा; अबू आझमी यांनी केली भूमिका स्पष्ट
राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) इतर छोटे पक्ष, अपक्ष कोणाला मत देणार याबाबत संभ्रम असताना समाजवादी पार्टीने (SP Support MVA) आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्याचे आमदार अबू आझमी (Abu Azmi MVA Vote) यांनी यावेळी सांगितले.
अबू आझमी यांची भूमिका - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी रस्सीखेच सुरू असून, आपल्या मतांचा आकडा गाठण्यासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सत्ताधारी आघाडी सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराजीचे सूर होते. सर्व अपक्ष, इतर छोट्या पक्षांची मते कोणाच्या पथ्यावर पडणार, याबाबत संभ्रम वाढला होता. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी ही, याबाबत खुलासा केला.
महाविकास आघाडीला मत देणार - आझमी म्हणाले की, महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेला मतदान करणार का, असा प्रश्न विचारला असता, आघाडीला मत देणार असून त्यांनी ठरवावे ते कोणाला द्यायचे. तसेच आमची नाराजी दूर झाली असल्याने आघाडीला पाठिंबा दिल्याचे आझमी म्हणाले.