मुंबई -विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे अभिजीत बिचुकले यांनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकले पत्रात म्हणाले आहेत.
हेही वाचा... राज्यपाल कोश्यारींची सत्ता स्थापनेसाठी भाजपला विचारणा
जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला सर्व आमदारांनी पाठिंबा द्यावा आणि मंत्रीमंडळामध्ये योग्य मंत्रीपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.