महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Abdul Sattar : 'एकनाथ शिंदेंच्या बाणासमोर कोणताही बाण टिकणार नाही' - अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे

कोणीही कितीही दावे केले तरी आपली शिवसेना ओरिजिनल आहे. कोणताही बाण समोर आला, तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या बाणासमोर टिकूच शकत नाही, असा दावा बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी ( abdul sattar on cm eknath shinde ) केला.

Abdul Sattar
Abdul Sattar

By

Published : Jul 15, 2022, 10:28 PM IST

मुंबई -कोणीही कितीही दावे केले तरी आपली शिवसेना ओरिजिनल आहे. कोणताही बाण समोर आला, तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या बाणासमोर टिकूच शकत नाही, असा दावा बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांनी केला. अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत आलो आणि शिवसैनिक झालो, असेही सत्तार म्हणाले. रवींद्र नाट्य मंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार मेळावा आयोजित केला होता. सत्तार यांनी यावेळी शक्तीप्रदर्शन करत गेल्या अडीच वर्षातील खंत बोलून ( abdul sattar on cm eknath shinde ) दाखवली.

अब्दुल सत्तार यांनी म्हटलं की, राजकारणात मी 40 वर्षांचा साक्षी आहे. अशोक चव्हाण यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 10 पटीने काम करतात. आजवर 20 तास काम करणारे शिंदे पहिले मुख्यमंत्री आहेत. 42 वर्षांच्या राजकरणात 7 मुख्यमंत्री पाहिले पण शब्दपूर्ती करणारे हेच. रात्री 2 वाजेपर्यंत आमच्यासाठी काम करताना शिंदे साहेबांना पाहिले आहे, अशी स्तुतीसुमने अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर उधळली. तसेच, 1 हजार कोटी रुपयांच्या योजना आपल्या मतदारसंघात मंजूर झाल्या. जे काम 2 वर्षात पूर्ण झाले नाही, ते मुख्यमंत्री यांनी करून दिले. सूतगिरणीची मागणी 1980 पासून होती. इतक्या वर्षात मंजूर नाही झाली, ती 80 तासांत मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजूर केली, असे सत्तार यांनी सांगितलं.

'शंभर आमदार तर मी रडताना पाहिले' - विधानसभेत जेव्हा तुम्ही तासभर बोलत होतात, त्यावेळेला लाखो लोक रडत होते. शंभर आमदार तर मी रडताना पाहिले. आमच्या सभागृहात रडताना पाहिले. आपल्या परिवाराचा प्रमुख बोलतो आहे, असा विचार करून सभागृहात शांतता होती. ज्या वेळी शिंदे साहेबांकडे गेलो, त्या प्रत्येकवेळी काम झाले. एकदा तर एक काम थोडे राहिले होते. सेक्रेटरी म्हणाले, हे मुख्यमंत्र्यांकडून लिहून आणावे लागेल. त्यावेळी दोन वाजले होते. मात्र, तरीदेखील त्यांनी आपले काम केले, अशा शब्दांत अब्दुल सत्तार यांनी शिंदेच्या कामकाज पद्धतींना उजाळा दिला.

'कोणताही बाण समोर आला तरी...' -काँग्रेसमध्ये यापूर्वी काम केले. शिवसेना मला माहीत नव्हती. अडीच वर्षांपूर्वी मी शिवसेनेत आलो. शिवसेनेमध्येही इमानदार, वचनबद्ध लोक आहेत. वचनाच्या माध्यमातून चालणारे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून जाणारे, न्याय देणारे मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे. मी काही स्तुती करत नाही, जे खरे आहे तेच बोलतो. आपली शिवसेना ओरिजिनल आहे. धनुष्यबाण वाली आहे. कोणताही बाण समोर आला, तरी एकनाथ शिंदे साहेबांच्या बाणासमोर टिकूच शकत नाही, असे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा -Uddhav Thackeray : शिवसैनिकावर हल्ला, उद्धव ठाकरे संतापले; म्हणाले, 'जीवाशी येत असेल तर खपवून...'

ABOUT THE AUTHOR

...view details