मुंबई- शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार ( Abdul Sattar in trouble ) अडचणीत आले आहेत. त्यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे ( TET scam case ) रद्द केल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये पैसे घेऊन पास कमाजी शिक्षण परिषदेचे अध्यक्ष तुकाराम तुपे अटक करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेच्या ( TET scam in Maharashtra ) घोटाळा प्रकरणाचे लोण थेट सिल्लोडपर्यंत पोहोचले आहे. परीक्षा परिषदे डून जी यादी जाहीर करण्यात आली त्यामध्ये सर्व अपात्र असणाऱ्या लोकांनी पात्र होण्यासाठी सुपे यांना पैसे दिले होते. मात्र सुपे यांच्याकडून अपात्र उमेदवारांना पात्र असण्याचे सर्टिफिकेट मिळाले नाहीत.
माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन्ही मुलींची टीईटी प्रमाणपत्रे रद्द- हिना आणि उजमा या दोन्ही शिक्षिका अब्दुल सत्तार यांच्या ( Daughters of Abdul Sattar ) मुली आहेत. 2020 मध्ये त्या अपात्र आहेत. सायबर पोलीस आणि परीक्षा परिषद यांनी जी यादी प्रसिद्ध केली त्यामध्ये या दोन्ही मुलींचा समावेश आहे. ऊजमा आणि हिना यांनी कुठल्या एजंटला पैसे दिले हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. या यादीमध्ये संभाजीनगर जिल्हय़ातील काही उमेदवारांचा समावेश असून यादी जाहीर झाल्यानंतर गैरप्रकारात अडकलेल्या उमेदवारांची नावेही समोर आलेली आहेत. या टीईटी घोटाळ्यात सिल्लोडचे आमदार, माजी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हीना कौसर अब्दुल सत्तार शेख आणि उझमा नाहीद अब्दुल सत्तार शेख या दोन मुलींचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.