मुंबई: मुंबईसह राज्यात मुलं चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्यात त्यातच मुलांचे अपहरण केल्याच्या अफवांचे सुद्धा पेव फुटलेले आहे. मुंबईत मूल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नसलेल्या एका व्यक्तीने 2 वर्षांच्या मुलीचा अपहरण केलं होते. वांद्रे परिसरात ही खळबळजनक घटना घडली हा मूल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या फोटोच्या आधारे कोणीही आरोपीस पाहिल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी Bandra Police जनतेला केले आहे.
Mumbai Crime : सावधान! गुडघ्या खालून दोन्ही पाय नसलेल्या आशिकने 2 वर्षाच्या मुलीचे केले अपहरण - आशिकने 2 वर्षाच्या मुलीचे केले अपहरण
Mumbai Crime: मुंबईसह राज्यात मुलं चोरीला जाण्याच्या घटना वाढू लागल्यात त्यातच मुलांचे अपहरण केल्याच्या अफवांचे सुद्धा पेव फुटलेले आहे. मुंबईत मूल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुडघ्याच्या खाली दोन्ही पाय नसलेल्या एका व्यक्तीने 2 वर्षांच्या मुलीचा अपहरण केलं होते. वांद्रे परिसरात ही खळबळजनक घटना घडली हा मूल चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि सीसीटीव्ही फुटेजमधून मिळालेल्या फोटोच्या आधारे कोणीही आरोपीस पाहिल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी Bandra Police जनतेला केले आहे.
या आरोपीचे नाव आशिक असल्याचे समजत आहे, अशील या दोन्ही पायांनी अपंग असून त्याला गुडघ्याखाली पाय नाही. आशिकला पाय नसले, तरी तो गुडघ्यांवर व्यवस्थित चालू शकतो. गर्दुल्ला असून त्याला ड्रग्सचे व्यसन आहे. आशिक भीक मागून आपलं पोट भरतो.
अपहरणाचा गुन्हा दाखल आशिकला वांद्रे परिसरात फिरत असताना 2 वर्षांची चिमुकली घराबाहेर खेळताना दिसली आणि त्याने गोड बोलून या मुलीला आपल्याकडेवर घेऊन पळ काढला आहे. बराचवेळ झाला मुलगी घरी परतली नाही, म्हणून तिच्या घरच्या पालकांनी शोध घ्यायला सुरुवात केली. मुलगी कुठेच न सापडल्याने पालकांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये त्यांना पाय नसलेला एक व्यक्ती तिला उचलून नेत असल्याचे दिसले. त्यानंतर कुटुंबीयांनी तात्काळ वांद्रे पोलीस ठाण्यात Bandra Police Station धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.