मुंबई - गोरेगावच्या आरे पोलिसांनी एका व्यावसायिक महिलेशी मैत्री करून तिच्याशी शारीरिक संबंधांचा व्हिडिओ बनवणाऱ्या दिल्लीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. महिला पतीसोबत राहायला गेल्यावर आरोपीने महिलेचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत साडे चार रुपये घेतले. यानंतरही महिलेने त्याच्यासोबत संबंध ठेवण्यास नकार दिल्याने तिने महिलेचा इंटिमेट व्हिडिओ तिच्या पतीला ( woman pornographic video Sent her husband ) पाठवला. शेवटी महिलेने आरे पोलिसांकडे तक्रार केली. आरे पोलिसांनी आरोपीला दिल्लीतील कमला विहार येथून अटक ( Aarey police arrested a young man ) केली आहे. त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाई यांची प्रतिक्रिया महिलेशी जवळीक साधून बनवला अश्लिल व्हिडिओ -
आरे कॉलनीतील रॉयल पाम परिसरात राहणाऱ्या एका विवाहित व्यावसायिक महिलेने आरे पोलिसांकडे तक्रार केली होती की, ती 2016 मध्ये पाटणा, बिहार येथे व्यक्तिमत्व विकास सेमिनारला गेली होती. तेव्हा तिची भेट आरोपी कृष्णकांत अखोरी (25) याच्याशी झाली. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर जवळीकीत झाले होते. दोघे एकमेकांना अनेकदा भेटले आणि एकत्र राहिले. आरोपीने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेऊन तिचे व्हिडिओ, फोटो काढले.
'तो' व्हिडिओ पाठवला पतीला -
त्यावेळी तक्रारदार महिलेचे पतीसोबत भांडण होत होते. त्यामुळे ती पतीपासून दूर राहिली होती. याचा फायदा घेत आरोपीने महिलेशी संबंध प्रस्थापित करण्यास सुरुवात केली. परंतु काही वर्षांनी महिला आणि तिचा पती मुंबईत एकत्र राहू लागले. त्यानंतर आरोपी कृष्णकांत याने महिलेला भेटण्यासाठी आणि संबंध ठेवण्यासाठी अनेकवेळा दिल्लीला बोलावले, मात्र महिलेने नकार दिला. यापूर्वी बनवलेला इंटिमेट व्हिडिओ पतीला पाठवण्याच्या नावाखाली आरोपींनी वेगवेगळ्या वेळी तिच्याकडून सुमारे चार लाख रुपये उकळले. त्यानंतरही तो महिलेकडे पैशांची मागणी करू लागला. महिलेने त्याला नकार दिल्यावर आरोपीने महिलेचा व्हिडिओ तिच्या पतीला पाठवला.
आरोपीला पोलीस कोठडी -
महिलेच्या पतीच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कलम ३८५,३५४ (अ) आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. आरे पोलीस ठाण्याचे तपास पथकाने आरोपींच्या मोबाईल लोकेशनच्या आधारे तपास सुरू केला. आरोपी दिल्लीतील कमला विहार येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन त्याला अटक केली. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा -Thane Crime : जुगारी बापाने घेतला आपल्याच मुलीचा जीव