महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आरे जंगलात लागलेल्या आगीवर मिळवलं नियंत्रण - आरे जंगलात आग

aare-forest-fire
aare-forest-fire

By

Published : Feb 15, 2021, 3:41 PM IST

Updated : Feb 15, 2021, 5:59 PM IST

17:56 February 15

आरे जंगलात लागलेल्या आगीवर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. 

17:53 February 15

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.  आगीवर नियंत्रण मिळणे कठिण जात आहे. रॉयल पाम हॉटेलजवळ ही भीषण आग लागली आहे.  

15:28 February 15

आरे जंगलात लागलेल्या आगीवर मिळवलं नियंत्रण

आरे जंगलात आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई -  आरे जंगलात आग लागल्याची घटना घडली आहे. रॉयल पाम हॉटेलमधून फेकण्यात आलेल्या कचऱयाने पेट घेतल्याने ही आग लागली. अद्याप आगीवर नियंत्रण मिळू शकलेले नाही. 

मुंबई आणि ठाण्यापासून मध्ये संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य आहे. या अभयारण्याच्या दक्षिण बाजूला आरे कॉलनी वसलेली आहे. तिथं जाण्यासाठी गोरेगाव, जोगेश्वरी तसंच पवई या परिसरातून चांगल्या रस्त्याची सोय आहे. आरे कॉलनी परिसरात पवई तलाव, विहार सरोवर आहे. मुंबईची मिठी नदीही याच आरे कॉलनीच्या जंगलातून वाहते. आरे कॉलनीत काही आदिवासी पाडेही आहेत.  

मेट्रो कारशेड प्रकरण - 

युतीत असलेल्या शिवसेनेचा विरोध डालवून देवेंद्र फडणवीस सरकारने आरेमध्येच कारशेड उभारण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रीय हरित लवाद आणि सर्वोच्च न्यायालयानेही याच जागेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर मुंबई मेट्रो रेल कापरेरेशनने रातोरात या ठिकाणची झाडे तोडून कारशेड उभारणीच्या कामाला सुरूवात केली होती. तसेच आरेचे जंगल वाचवण्यासाठी आंदोलन करणारे नागरिक, पर्यावरणवाद्यांवर गुन्हे दाखल केले होते. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचाही वृक्षतोडीला विरोध होता. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 नोव्हेंबर 2019 रोजी मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली  मेट्रो तीनसाठीचे कारशेड आता आरेऐवजी कांजूरमार्ग येथे उभारण्यात येणार आहे.  

Last Updated : Feb 15, 2021, 5:59 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details