मुंबई - मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक प्रकरणात चौकशीच्या फेर्यात भाजप नेते, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अडकले आहेत. त्यांच्या अटकेची मागणी आपचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे यांनी लावून धरली आहे. धनंजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या प्रश्नावर बोलताना प्रवीण दरेकर यांनी हा संपूर्ण प्रकार म्हणजे नौटंकी असल्याचे म्हटले आहे.
आप पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल
मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक ( Mumbai District Central Bank ) व भाजप नेते प्रवीण दरेकर ( BJP leader Praveen Darekar ) यांनी बँकेची निवडणूक मजूर या प्रवर्गातून लढविली. त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप आप पक्षाचे महाराष्ट्र सचिव धनंजय शिंदे ( AAPs Maharashtra secretary Dhananjay Shinde ) यांनी यापूर्वीच केला होता. या प्रकरणात प्रवीण दरेकर ( Pravin Darekar probe ) यांची चौकशी सुरू आहे.
भाजप तसेच प्रवीण दरेकर यांच्याविरोधात घोषणाबाजी
न्यायालयाने त्यांना तात्पुरता दिलासासुद्धा दिला आहे. परंतु प्रवीण दरेकर यांच्या अटकेची मागणी आपच्या कार्यकर्त्यांनी केली. आपच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेश कार्यालयाच्या बाहेर हल्लाबोल केला. भाजप तसेच प्रवीण दरेकर यांच्या विरोधात या प्रसंगी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. या दरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करून आपच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले.