महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aap oppose metro car shed : आरेमध्ये कारशेड होऊ देणार नाही, आम आदमी पार्टीचा इशारा - आरेत मेट्रो कारशेडचा आप पक्षाकडून विरोध

'आरे'मध्ये मेट्रो - 3 कारशेड होऊ नये या विरोधात ( Aap oppose metro car shed in Aarey ) शहरातील आम आदमी पक्षाने आंदोलन केले आहे. कारशेडच्या निर्मिताल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि इतर सामाजिक संघटनांकडून विरोध केला जात असून कारशेडचे काम सुरू करू नये अशी मागणी आप पक्षाकडून होत आहे.

Aap oppose metro car shed in Aarey
आरेत मेट्रो कारशेडचा आप पक्षाकडून विरोध

By

Published : Jul 24, 2022, 1:07 PM IST

मुंबई -'आरे'मध्ये मेट्रो - 3 कारशेड होऊ नये या विरोधात ( Aap oppose metro car shed in Aarey ) शहरातील आम आदमी पक्षाने आंदोलन केले आहे. कारशेडच्या निर्मिताल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून आणि इतर सामाजिक संघटनांकडून विरोध केला जात असून कारशेडचे काम सुरू करू नये अशी मागणी आप पक्षाकडून होत आहे. शिंदे - भाजप सरकारने आरेतच कारशेड बांधण्याच निर्णय घेतला आहे. पर्यावरणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आल्याने या निर्णयाविरोधात आता निसर्गप्रमी आणि इतर संघटना आक्षेप नोंदवत आहेत.

विरोध प्रदर्शनाचे दृश्य

हेही वाचा -CM Eknath Shinde Depart Tonight : द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला मुख्यमंत्री लावणार हजेरी; आज रात्री विशेष विमानाने रवाना

आरेमध्ये मेट्रो - 3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र, नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने हा प्रस्ताव गुंडाळला. तसेच, कारशेडसाठी इतर जागा शोधण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र, आघाडी सरकार पडल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा आरेतच कारशेड करण्याचा निर्देश दिले आहेत. याचा विरोध होत आहे. आरे हे जैवविविधतेने संपन्न असून या प्रकल्पाने या निसर्ग संपत्तीला धोका निर्माण होऊन पर्यावरणाला देखील इजा होईल, असा काहींचा मत प्रवाह आहे. आप पक्षाने देखील कारशेड विरोधात आंदोलन करून भाजपविरोधात मोर्चा खोलला आहे.

आम आदमी पक्ष भविष्यातही लोकशाही पद्धतीने या प्रकरणी विरोध करणार. विकास कामाला आमचा विरोध नाहीच, मात्र आरेमधल हिरवळ आम्हाला वाचवायची आहे, म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, असे आम आदमी पक्षातर्फे म्हटले जात आहे. मेट्रो कारशेड 3 कांजूरमध्ये व्हावे अशी मागणी पक्षाकडून होत आहे. याप्रकरणी भविष्यात न्यायालयात जण्याची आपली तयारी असल्याचेही आप पक्षाकडून सांगण्यात आले.

आरे मुंबईचं फुफ्फुस -आरेच्या या 1 हजार 800 एकर वनक्षेत्राची 'मुंबईचे फुफ्फुस' म्हणून ओळख आहे. आरेच्या जंगलात बिबट्यांशिवाय जवळपास 300 प्रजातींचे प्राणी आढळतात. हे उपनगर गोरेगाव येथे असून ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडलेले आहे. इथे मुंबईच्या कानाकोपऱ्यातील लोक शनिवार रविवारी स्वच्छ प्रदूषण मुक्त वातावरणाचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांच्या मते, जंगले केवळ शहरातील लोकांना ताजी हवा देत नाहीत, तर ते वन्यजिवांसाठी एक प्रमुख अधिवास देखील आहे. त्यापैकी काही स्थानिक आहेत. या जंगलात सुमारे पाच लाख झाडे असून अनेक नद्या आणि तलाव येथून जातात.

2014 पासून आरे वादात - आरेमध्ये मेट्रो - 3 कारशेड बांधण्याचा प्रस्ताव प्रथम 2014 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडला होता. ज्याला स्थानिक एनजीओ वनशक्तीने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यानंतर फडणवीस यांनीही हाच प्रस्ताव पुढे केला. मात्र, कारशेडसाठी आरेतील झाडे तोडण्यास कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केला. मग उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कारशेडसाठी कांजूरमार्ग निवडला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा कांजूरमार्ग ऐवजी आरे कॉलनीत कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच राज्याचे महाधिवक्ता आणि प्रशासनाला दिले.

हेही वाचा -सावधान..! जुहू बीचवर आढळला 'हा' धोकादायक जलचर, डंखसाठी कुप्रसिद्ध

ABOUT THE AUTHOR

...view details