महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Municipal Corporation Election मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आप पक्ष मैदानात, 'ही' असणार रणनीती - दिल्ली प्रमाणे मुंबईसाठी रणनीती तयार

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai Municipal Corporation Election सर्वच पक्ष तयार असले तरी, 'आम आदमी पक्षा' ने AAP field देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी आम आदमी पक्षाकडून सर्वसामान्य मुंबईकर हा केंद्रस्थानी असून, त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याची तयारी आम आदमी पक्षाकडून strategy ready for Mumbai like Delhi सुरू आहे.AAP field for Mumbai municipal Corporation elections

Mumbai Municipal Corporation Election
आप पक्ष मैदानात

By

Published : Sep 10, 2022, 6:03 PM IST

Updated : Sep 10, 2022, 7:25 PM IST

मुंबईमुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी Mumbai Municipal Corporation Election सर्वच पक्ष तयार असले तरी, 'आम आदमी पक्षा' ने AAP field देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. महापालिकेवर सत्ता आणण्यासाठी आम आदमी पक्षाकडून सर्वसामान्य मुंबईकर हा केंद्रस्थानी असून, त्यासाठी वेगवेगळ्या योजना आणण्याची तयारी आम आदमी पक्षाकडून strategy ready for Mumbai like Delhi सुरू आहे. AAP field for Mumbai municipal Corporation elections

प्रतिक्रिया देतांना रमेश देशपांडे


मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आणण्यासाठी सर्वच पक्षाने आपली कंबर कसली आहे. गेल्या 25 वर्षांपासुन मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र या निवडणुकीत शिवसेनेला पराभूत करून, भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिकेवर आपली सत्ता आणायची आहे. यासाठी आतापासूनच शिवसेना, भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, काँग्रेस आणि एकनाथ शिंदे गट यांच्या वेगवेगळ्या बैठका चर्चा सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेचे राज्यातच नाही, तर देशात एक वेगळे स्थान आहे. देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख असली तरी, देशाच्या आर्थिक राजधानीचे केंद्रस्थान देखील मुंबई आहे. त्यामुळे राजकीय दृष्ट्या मुंबई महानगरपालिकेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणूनच सर्वच पक्षांनी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आपली सर्व ताकद पणाला लावण्याची तयारी केली आहे. मात्र राज्यातील प्रमुख राजकीय पक्षात, सध्या देशभरात चर्चेत असलेला आम आदमी पक्ष देखील मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे.


सर्व 227 जागा लढवणारमुंबई महानगरपालिकेत 227 नगरसेवक दरवर्षी जिंकून येत असतात. नवीन प्रभाग रचनेनुसार ती संख्या 336 एवढी झाली होती. मात्र न्यायालयाने जुनी प्रभाग रचना कायम ठेवल्याने 227 जागांवर निवडणूक लढवण्याची तयारी आम आदमी पक्षाने केली आहे. गेल्या काही महिन्यापासूनच पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून, जवळपास 80 उमेदवार निश्चित करण्यात आले आहेत. आम आदमी पक्षाकडून एक कमिटीची स्थापना करण्यात आहे. निश्चित उमेदवार करण्याआधी त्या उमेदवाराची संपूर्ण माहिती संकलित केली जाते. उमेदवाराचे आर्थिक उत्पन्न, उत्पन्नाचे स्त्रोत, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि समाजासाठी काम करण्याबाबतची त्याची आवड याची तपासणी त्या कमिटी कडून केली जाते. आणि नंतरच उमेदवार निश्चित केला जातो, अशी माहिती आम आदमी पक्षाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष रमेश देशपांडे यांनी दिली आहे. सध्या अनेक वेळा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली लोक इतर पक्षाच्या माध्यमातून राजकारणात येत आहे. मात्र आम आदमी पक्षाकडून याची दक्षता घेतली जाते. कोणतीही गुन्हेगार पार्श्वभूमी नसलेल्या आणि समाजकारणाची आवड असलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी देण्याबाबत प्राथमिकता दिली जाते. त्यानुसार आम आदमी पक्षाचे नगरसेवक उमेदवार निवडले जात आहेत. आतापर्यंत 80 उमेदवार निवडण्यात आले आहेत, इतरही उमेदवार निवडण्याचे काम पक्षाकडून सुरू असल्याचे रमेश देशपांडे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.


'हर घर दस्तक' धोरणमुंबईतील ६० टक्के जनता ही झोपडपट्टी आणि निन्म मध्यमवर्गीय आहे. ज्या लोकांवर आम आदमी पक्षाने आपले लक्ष केंद्रित केला आहे. प्रत्येक मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचण्याचा धोरण आम आदमी पक्षाने तयार केला आहे. 'हर घर दस्तक' असे या धोरणेच नाव आहे. आम आदमी पक्ष मुंबई महानगरपालिकेत निवडून आल्यास, सामान्य मुंबईकरांसाठी कोणकोणत्या सोयी सुविधा उपलब्ध केल्या जातील, याबाबतची माहिती पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा सामान्य मुंबईकरांच्या घरापर्यंत पोहोचून सांगत आहे. सध्या सामान्य मुंबईकरांना पाणी, वीज, प्रवास शिक्षण या सगळ्या समस्या भेडसावत आहेत. या सर्व समस्यांबाबत आम आदमी पक्षाकडे योजना तयार असून, महानगरपालिकेत आम आदमी पक्षाची सत्ता आल्यास या सर्व सुविधा मुंबईकरांना मोफत मिळतील असे आश्वासन, आम आदमी पक्षाकडून देण्यात येत आहे.


दिल्ली पॅटर्न मुंबईत राबवणारखास करून शिक्षण आणि आरोग्य या दोन महत्त्वाच्या समस्या मुंबईकरांना भेडसावत आहेत. यासाठी मोहल्ला क्लिनिक उभारण्याची योजना आम आदमी पक्षाची आहे. प्रत्येक वार्ड मध्ये एक मोहल्ला क्लिनिक असले पाहिजे, अशी आम आदमी पक्षाची संकल्पना आहे. दिल्लीमध्ये प्रत्येक मोहल्यामध्ये मोहल्ला क्लिनिकाची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना त्याचा खूप मोठा फायदा झाला आहे. प्रत्येक वार्डमध्ये मोहल्ला क्लिनिक असल्याने त्या परिसरातल्या नागरिकांना थेट छोट्या मोठ्या आजारांसाठी त्या क्लिनिकमध्ये जाता येईल आणि त्यांचा वेळ आणि पैसा वाचू शकेल.

ग्राहकांनाही वीज मोफत देऊ ज्याप्रमाणे दिल्लीतली शिक्षण व्यवस्था आम आदमी पक्षाने बदलली, त्याचप्रमाणे मुंबईतली ही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे बदलली जाईल. महानगरपालिकेच्या शाळा अत्याधुनिक केल्या जातील. उच्च दर्जाचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत सामान्य मुंबईकरांच्या मुलांना मिळेल, अशी व्यवस्था आम आदमी पक्षाकडून केली जाणार असल्याची माहिती रमेश देशपांडे यांनी दिली आहे. तर तिथेच ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये महिलांना मोफत प्रवास आहे. त्याचप्रमाणे मुंबईतही बेस्ट मधून सर्व महिलांना व विद्यार्थ्यांना मोफत प्रवास देण्याबाबतची योजना आम आदमी पक्षाची आहे. तसेच बेस्टकडून जी वीज निर्मिती केली जाते. त्यांच्या ग्राहकांनाही वीज मोफत देऊ अशा प्रकारचा आश्वासन आम आदमी पक्षाकडून देण्यात येत आहे.


निवडणुकीत प्रचारासाठी महत्त्वाचे नेते येणारयावेळी होणाऱ्या मुंबई महानगरपालिकेला आम आदमी पक्षाने खूप महत्त्व दिले आहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रचाराला येणार आहेत. उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया खासदार संजय सिंह हे खास करून मुंबईवर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत. तर तिथेच आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारादरम्यान मुंबईत सभा घेणार आहेत. संपूर्ण देशभर अरविंद केजरीवाल यांच्या व्यक्तिमत्व बाबत आकर्षण आहे. मुंबईतही अरविंद केजरीवाल यांची सभा व्हावी, अशी मागणी सातत्याने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते तर करतच आहे. मात्र सामान्य नागरिक देखील अशा प्रकारची मागणी करत असल्याचे रमेश देशपांडे सांगतात आणि म्हणून यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांची मुंबईत सभा घेण्याबाबतचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

Last Updated : Sep 10, 2022, 7:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details