मुंबई -अनेक वेळा संधी असूनदेखील विरोधकांनी मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर चुप्पी साधली आहे. मुंबई महापालिका म्हणजे आजी-माजी सत्ताधाऱ्यांचे सभागृह झाले आहे, इथे विरोधक फक्त नावालाच आहेत. सेना, भाजपा, काँग्रेस व राष्ट्रवादी यांना फक्त सत्ता हवी आहे. यांना मुंबईच्या नागरी समस्या सोडवायच्या नसून फक्त सत्तेच्या खुर्चीत बसायचे आहे. आम आदमी पार्टी हा यांना फक्त सक्षम पर्याय म्हणून उभा नसून तो समस्यांची सोडवणूक करणारा पक्ष म्हणून समोर आला आहे. यासाठी आमचे तळागाळात काम सुरू असून पक्ष बांधणी होत आहे", असे आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी सांगितले.
मुंबई महापालिकेत विरोधक फक्त नावालाच, 'आप'ची टीका - आप'ची विरोधकांवर टीका
आम आदमी पार्टीच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांनी मुंबई महापालिकेच्या कामावर टीका केली. त्या म्हणाल्या,''मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आदींचे सदस्य आहेत. या सर्वांमध्ये विरोधक नावालाच असल्याचे दिसून येत आहेत. सभागृहात यांचे गळ्यात-गळे असतात. पण मुंबईकरांच्या नागरी सुविधांसाठी यांची गळाभेट होताना दिसत नाही. ''.
मुंबई महापालिकेत शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आदींचे सदस्य आहेत. या सर्वांमध्ये विरोधक नावालाच असल्याचे दिसून येत आहेत. सभागृहात यांचे गळयात-गळे असतात. पण मुंबईकरांच्या नागरी सुविधांसाठी यांची गळाभेट होताना दिसत नाही. मागील महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने शिवसेनेला पाठिंबा दिला. यामुळे शिवसेनेच्या महापौर, उपमहापौर आणि इतर समित्यांवर निवडी सोप्या झाल्या. परंतू यामध्ये भाजपाने अलिप्त राहून डाव खेळला आणि सर्व जबाबदारी शिवसेनेवर टाकून मोकळे झाले. प्रत्येकजण आपल्या सोयीचे राजकारण करताना दिसत आहे. सभागृहातील भाजपाची भूमिका कायम संदिग्ध राहिली आहे. सभागृहात व्यवस्थित 'सेटलमेंट' लावून मुंबईकरांना वाऱ्यावर सोडण्याचे काम भाजपाने केले, अशी टीका आपने केली.
मेनन पुढे म्हणाल्या, ''गेली २० वर्षे भाजप महापालिकेच्या सत्तेत सेनेसोबत भागीदार होती. मुंबईकरांना नागरी सुविधा पुरवण्यात जे अपयश आहे ते या दोघांचे आहे. शिवसेना आज भाजपाच्या फोडाफोडीवर बोलत आहे. परंतू सेनेने मनसेच्या बाबतीतदेखील हेच केले हे सेना सोईस्करपणे विसरत आहे. मनसेने केलेल्या 'सुपारी' राजकारणामुळे नागरिकांचे हित त्यांच्या यादीत सगळ्यात शेवटी असते हे आपल्याला टोल आंदोलनात दिसले आहे. काँग्रेसकडे जरी विरोधीपक्ष नेतेपद असले तरी सेनेला अवघड प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांना होत नाही आणि कधी झालेच तर ते राज्यातील युतीत मिळणारा वाटा टिकण्यासाठीच असणार आहे. वर्षानुवर्षे सत्तेत असून देखील आता भाजपा आता आपले अपयश लपवण्यासाठी महापालिकेच्या जबाबदारीतून हात झटकत आहे. काँग्रेसला फक्त पद आणि सत्ता हवी आहे, मग ती सत्तेच्या बाकावर असो किंवा विरोधी बाकावर. शिवसेनेला 'मॅनेज' होणारे विरोधक मिळालेत, ते त्यात खुश आहेत.''