मुंबई-आम आदमी पक्षाने मुंबईमधील विविध समस्यांवरून महापौर किशोरी पेडणेकर ( Aam Aadmi Party slammed Kishori Pednekar ) यांच्यावर खोचक टीका केली आहे. सर्वात वाईट कामगिरी केल्याने त्या सुवर्णपदकाच्या पात्र असल्याने आम आदमी पक्षाने ( Mumbai AAP on civic issues ) म्हटले आहे गेल्या ३० वर्षांपासून मुंबई महापालिकेत सत्तेत असूनही, शिवसेना मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्त्यांचे जाळे, ड्रेनेज पायाभूत सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था सुधारण्यात असमर्थ ठरल्याचा आरोपही आम आदमी पक्षाने केला आहे.
मुंबईमधील आपच्या पदाधिकाऱ्यांनी उपनगरात 'महापौरांसाठी सुवर्णपदक' या मथळ्यासह स्टिकर्स लावले आहेत. त्यात महापौर आणि शिवसेना हे अकार्यक्षम, बेजबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. नागरी समस्यांकडे लक्ष देण्यास शिवसेना व महापौर अपयशी झाल्याचा लेखाजोखा तयार करण्यात आला आहे.
हेही वाचा-Vehicles entry in Kolhapur : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला टोपली; तपासणीविना कर्नाटकातून महाराष्ट्रात वाहने दाखल
आपने दैनंदिन जीवनाच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम करणाऱ्या नागरी समस्या समोर ठेवल्या आहेत. यामध्ये अगणित खड्डे, अत्याधिक पाइपलाइन लिकेज, उघडे मॅनहोल्स आणि नाले, विखुरलेला कचरा, तुटलेले फूटपाथ, रस्त्यांवरील जीर्ण वाहने आणि बरेच काही यांचा यात समावेश आहे.
हेही वाचा-Shreya Ghoshal lashes out netizens : पराग अग्रवाल प्रकरणी नेटिझन्सना श्रेया घोषालने नम्रपणे सुनावले खडे बोल!
बीएमसीची शहराच्या पायाभूत सुविधांकडे डोळेझाक
आप मुंबईचे नेते गोपाल झवेरी ( Gopal Zaveri on Mumbai issues ) म्हणाले, की गेल्या ३० वर्षांपासून बीएमसीमध्ये सत्तेत असूनही, शिवसेना मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतागृहे, रस्त्यांचे जाळे, ड्रेनेज पायाभूत सुविधा आणि घनकचरा व्यवस्थापन व्यवस्था सुधारण्यात असमर्थ ठरली आहे. शिवसेने अत्यावश्यक सार्वजनिक सेवांच्या तरतूदीकडे डोळेझाक केली आहे. भारतातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज असलेल्या महापालिकेचे वार्षिक अंदाजपत्रक ३९,००० कोटींहून अधिक आहे. तरीही बीएमसीची शहराच्या पायाभूत सुविधांकडे डोळेझाक करत आहे. या सगळ्यांमुळे मुंबईकरांना संघर्ष करावा लागत आहे.
हेही वाचा-IMD Weather Alert Rains : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, 3 दिवस सरी कोसळणार
लक्षात घेऊन नागरिकांनी आपले प्रतिनिधी निवडावेत-प्रीती शर्मा मेनन
बीएमसीमधील भ्रष्टाचार आजवरच्या उच्चांकावर आहे. कामगिरी आजपर्यंतच्या खालच्या पातळीवर आहे. मुंबईच्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या महापौर म्हणून किशोरी पेडणेकर सुवर्णपदकाच्या पात्र आहेत, अशी खोचक टीका आप राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य व मुंबई प्रभारी प्रीती शर्मा मेनन ( Preeti Sharma Menon slammed Shivsena ) यांनी केली आहे. त्यांनी म्हटले, की गेल्या 30 वर्षांपासून आपण नागरिक म्हणून सर्वजण अकार्यक्षमतेचे आणि उदासीनतेचे साक्षीदार आहोत. ते लक्षात घेऊन नागरिकांनी आपले प्रतिनिधी निवडावेत, असे आमचे आवाहन आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
मुंबईकरांचा शिवसेनेवर विश्वास -
महापौर किशोरी पेडणेकर यांनी नुकतेच म्हटले की, मुंबईकरांनी गेले २५ वर्षे शिवसेनेवर विश्वास दाखवला आहे. यामुळे पालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईत शिवसेनेचा भगवा भक्कम आहे. शिवसेना हा पक्ष वेळ काळ न बघता लोकांना मदत करणारा पक्ष आहे. यामुळे कोणाला निवडून द्यायचे, हे वेळ आणि काळ ठरवेल.
संबंधित बातमी वाचा-BMC election opinions : मुंबई महापालिकेत कोणत्या पक्षाचा होणार महापौर, जाणून घ्या, काय म्हणतात राजकीय पक्ष!