महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

AAP on Pravin Darekar : दरोडेखोर प्रवीण दरेकरांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवा, आपची मागणी

प्रवीण दरेकर ( Praveen Darekar in scam ) यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे चौकशी ( 200 crore scam by Pravin Darekar ) करण्यात यावी, अशी आपच्या ( MH AAP leaders in Maharaashtra ) नेत्यांनी मागणी केली आहे. मुंबई बँक एक सहकारी बँक ( Mumbai district cooperative bank ) आहे. तिथे दरेकर यांनी बँकेची फसवणूक करून मंजूर असल्याचा दावा केला.

आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद
आम आदमी पक्षाची पत्रकार परिषद

By

Published : Mar 29, 2022, 7:18 PM IST

Updated : Mar 29, 2022, 7:48 PM IST

मुंबई -भाजप नेते व राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना तात्काळ पदावरून हटवण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे. ही मागणी आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन व धनंजय शिंदे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली आहे. दरेकर यांना मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून तात्काळ हटविण्यात यावे, अशीही त्यांनी मागणी केली.

काय म्हटले आपच्या नेत्यांनी?-प्रवीण दरेकर ( Praveen Darekar in scam ) यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात त्यांनी केलेल्या दोनशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याचे चौकशी ( 200 crore scam by Pravin Darekar ) करण्यात यावी, अशी आपच्या ( MH AAP leaders in Maharashtra ) नेत्यांनी मागणी केली आहे. मुंबई बँक एक सहकारी बँक ( Mumbai district cooperative bank ) आहे. तिथे दरेकर यांनी बँकेची फसवणूक करून मंजूर असल्याचा दावा केला. 2011 ते 2021 या कालावधीत त्यांनी 2 टर्म अध्यक्ष म्हणून काम केले. या कालावधीत सहकार विभाग आणि नाबार्डच्या लेखा परीक्षण अहवालानुसार 2015 ते 2021 या कालावधीत दोनशे कोटींच्या गैरव्यवहाराशी संबंधित अनियमितता आढळून आली. या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी आपने केली आहे.

प्रवीण दरेकरांना विरोधी पक्षनेते पदावरून हटवा



दरेकरांना विरोधीपक्षनेते पदावरून हटवा-पुढे बोलताना आपचे नेते धनंजय शिंदे म्हणाले की, विरोधी पक्ष नेते हे पद सन्मानाचे पद आहे. दरेकरांसारख्या अप्रामाणिक, भ्रष्ट नेत्याला आपण या पदावर बसू देऊ शकत नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री सुभाष देशमुख, चंद्रकांत पाटील हे नेतेदेखील वेळोवेळी दरेकरांची पाठराखण करत आहेत. यामुळे दरेकर यांनी केलेल्या गुन्ह्याला फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हेदेखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे दरेकर यांनी एक तर राजीनामा द्यावा अथवा राज्याच्या सहकार मंत्र्यांनी दरेकर यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात येत आहे.

Last Updated : Mar 29, 2022, 7:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details