मुंबई - मुंबई महापालिकेच्या अख्यातरित्यातील राणीबाग म्हणजेच 'वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात' अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उभारण्यात आलेले सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पक्ष्यांचे नंदनवन, माकड प्रदर्शनी, 'बायोम' थीमवर आधारित उद्यान या सुविधा उभारण्यात आल्या आहेत. त्याचे लोकार्पण महाराष्ट्राचे पर्यावरण व पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात ( Aaditya Thackeray Inauguration BioTheme ) आले.
Aaditya Thackeray Inauguration BioTheme : आदित्य ठाकरेंनी केले राणीबागेतील 'बायोम थीम' उद्यानांचे लोकार्पण - आदित्य ठाकरेंच्या हस्ते राणीबागेतील बायोम थीम लोकार्पण
राणीबागेतील सांडपाणी प्रक्रिया केंद्र, पक्ष्यांचे नंदनवन, माकड प्रदर्शनी, 'बायोम थीम'वर आधारित सुविधांचे लोकार्पण आदित्य ठाकरेंनी केले ( Aaditya Thackeray Inauguration BioTheme ) आहे.
मुंबई महापालिका नागरिकांना सोयी सुविधा देताना त्यांच्या विरंगुळ्याचा प्राधान्याने विचार करत असते. याच भूमिकेतून उद्याने, प्राणीसंग्रहालये यासारखी विरंगुळ्याची विविध ठिकाणे उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. याच अनुषंगाने वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांच्या आधुनिक प्रदर्शन कक्षांचे, 'बायोम' थीमवर आधारित उद्यानाचे आणि सांडपाणी प्रक्रिया संयंत्रणेचे लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज ( 17 एप्रिल ) करण्यात आले. याप्रसंगी आमदार यामिनी यशवंत जाधव, माजी महापौर किशोरी किशोर पेडणेकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉक्टर संजीव कुमार, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.