महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मोफत लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार, आदित्य ठाकरेंच्या ट्विटमुळे संभ्रम - राज्यात मोफत लसीकरण

मोफत लस देण्याबाबत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रकारांना माहिती दिली होती. आदित्य ठाकरे यांनीही या आशयाचे ट्विट केले होते. काही वेळानंतर मात्र आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट डिलिट करून सुधारित ट्विट केले. यामध्ये मोफत लस देण्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे म्हटले आहे. लोकांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून मी अगोदरचे ट्विट डिलिट केले आहे. अगोदरच्या ट्विटमध्ये मोफत लस देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पर्यावरण मंत्री ठाकरे म्हटले होते. आता सुधारित ट्विटमध्ये लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समितीमार्फत अधिकृतपणे जाहीर येईल, असे नमूद केले आहे. यामुळे नागरिकांना मोफत ‘कोरोना’ लस मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.

Aaditya Thackeray, आदित्य ठाकरे
आदित्य ठाकरे

By

Published : Apr 26, 2021, 12:07 PM IST

मुंबई- राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील लोकांना सरकार मोफत ‘कोरोना’ लस देणार असल्याची राष्ट्रवादी काँग्रेसने घोषणा केली. मात्र मोफत लसीबाबतचे अधिकृत धोरण उच्चाधिकार समिती ठरवणार आहे, असे ट्विट पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले आहे. यामुळे लस मोफत मिळणार की नाही, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

मोफत लस देण्याबाबत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी शनिवारी पत्रकारांना माहिती दिली होती. आदित्य ठाकरे यांनीही या आशयाचे ट्विट केले होते. काही वेळानंतर मात्र आदित्य ठाकरे यांनी हे ट्विट डिलिट करून सुधारित ट्विट केले. यामध्ये मोफत लस देण्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नसल्याचे म्हटले आहे. लोकांमध्ये संभ्रम होऊ नये म्हणून मी अगोदरचे ट्विट डिलिट केले आहे. अगोदरच्या ट्विटमध्ये मोफत लस देण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे पर्यावरण मंत्री ठाकरे म्हटले होते. आता सुधारित ट्विटमध्ये लसीबाबतचे धोरण उच्चाधिकार समितीमार्फत अधिकृतपणे जाहीर येईल, असे नमूद केले आहे. यामुळे नागरिकांना मोफत ‘कोरोना’ लस मिळणार का, हे पाहावे लागणार आहे.

आदित्य ठाकरेंनी केलेले ट्विट..

काय म्हणाले होते नवाब मलिक -

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील प्रत्येकाचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. टेंडर काढून लसीकरण करण्यात येणार असून सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल, अशी माहिती राज्याचे अल्पसंख्यांक आणि कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली होती.

सरकार ग्लोबल टेंडर काढणार -
केंद्र सरकारने १ मे पासून देशभरात १८ वर्षावरील लोकांना लसीकरण करण्याचा निर्णय जाहीर केला. केंद्र सरकार या लोकांना लस पुरवठा करणार नाही, हे स्पष्ट आहे. कोविशिल्ड केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खासगींना ६०० रुपये दर असणार आहेत. कोव्हॅक्सिनची किंमतसुध्दा ६०० रुपये राज्यांना व १२०० रुपये खासगींना असेल, असे मलिक यांनी सांगितले. मागच्या कॅबिनेटमध्ये या दराबाबत चर्चा झाली. सर्वांमध्ये एकमत झाले होते. राज्यातील जनतेला मोफत आणि लवकरात लवकरच लस देण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सकारात्मक होते. यावेळी कोरोना लसीकरणासाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहेत, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.

मोफत लस -
१ मे रोजी मुख्यमंत्री मोफत लसीबाबत भूमिका सांगतील. ग्लोबल टेंडर काढू. आदर पुनावाला म्हणाले एवढी लस देऊ शकत नाही. परंतु, आमची क्षमता आहे तेवढी देऊ. मात्र, इतर कंपन्यांच्या लसी सरकार घेणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details