मुंबई -महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी ईडीचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत ( Sanjay Raut On ED ) यांनी केला. तसेच यासंदर्भातील पत्र उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूयांना ( Sanjay Raut letter to Vice President Venkaiah Naidu ) दिले आहे. शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेयांनी राऊत यांच्या पत्राचे समर्थन करत, हे पत्रच ( Aaditya Thackeray about sanjay Raut ) बोलके असल्याची मार्मिक प्रतिक्रिया दिली. येत्या काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
संजय राऊतांची मागणी -
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेचे सभापती यांना पत्र लिहून चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय, असा आरोप केला आहे. भाजपच्या नेते वारंवार अनिल देशमुख यांच्या कोठडीत टाकण्याची धमकी देत आहेत. जबरदस्ती दादागिरी केली जात आहे. बाहेरच्या यंत्रणा महाराष्ट्राच्या नागरिकांना बेकायदेशीरपणे डांबून ठेवत आहेत. काही जण सुपार्या घेऊन येतात आणि दोन दिवस धमक्या देतात. मुंबई पोलिसांनी त्यावर कारवाई करायला हवी, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.