महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Suspicious Transgender loot women : ट्रेनमध्ये महिलेला लुटणाऱ्या संशयित तृतीयपंथीयाला पोलिसांनी केली अटक - Suspicious transgender loot women in local in mumbai

टॉय गनचा धाक दाखवून महिलेला लुटणाऱ्या ( Suspicious Transgender loot women in local in mumbai ) संशयित तृतीयपंथीयाला मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयित तृतीयपंथीयाला खार परिसरातून अटक केली आहे.

woman robbed by Suspicious transgender in mumbai
महिला लुट संशयित तृतीयपंथी मुंबई

By

Published : Apr 26, 2022, 11:06 AM IST

मुंबई -टॉय गनचा धाक दाखवून महिलेला लुटणाऱ्या ( Suspicious Transgender loot women in local in mumbai ) संशयित तृतीयपंथीयाला मुंबईच्या बोरिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी संशयित तृतीयपंथीयाला ( Suspicious Transgender news mumbai ) खार परिसरातून अटक केली आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी

हेही वाचा -Rana Attempt's For Bail : राणा दाम्पत्यांच्या जामिन अर्जावर आज सत्र न्यायालयात सुनावणी

21 एप्रिलला दादर रेल्वे स्थानकावरून विरारला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक महिला बसली होती. अंधेरी स्थानकावर आरोपी त्याच ट्रेनमध्ये चढला आणि महिलेकडे पैसे मागू लागला. तेव्हा महिलेने कमी पैसे दिले. यावर आरोपीने टॉय गन बाहेर काढली. महिलेने घाबरून तिच्याजवळील 4 हजार रुपये आरोपीला दिले आणि ट्रेन बोरिवली स्टेशनवर येताच आरोपीने उतरून पळ काढला. बोरिवली जीआरपीमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी आरोपीला खार परिसरातून अटक केली.

प्रफुल्ल उर्फ ​​सानिया पांचाळ, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तिचे वय २२ वर्षे आहे. तपासादरम्यान पोलिसांना कळले की, आरोपीविरुद्ध अंधेरी येथे चाकूचा धाक दाखवून लुटल्याचा गुन्हा दाखल आहे. तो खरच तृतीयपंथीय आहे की नाही, ते वैद्यकीय चाचणी केल्यावरच स्पष्ट होईल, असे पोलीस म्हणाले.

हेही वाचा -Today Petrol Diesel Rates : इंधनाची झळ! पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर; वाचा आजचे दर

ABOUT THE AUTHOR

...view details