महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

यूपीतला चोर, फक्त उन्हाळ्यात मुंबईत करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात - dadar police

मुळचा उत्तर प्रदेशातील असणारा हा चोर उन्हाळ्यातील तीन महिने चोरी करण्यासाठी मुंबईत यायचा. गेल्या 13 वर्षांपासून हंगामी चोरीचा त्याचा हा 'उद्योग' सुरू होता.

यूपीतला चोर, फक्त उन्हाळ्यात करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात
यूपीतला चोर, फक्त उन्हाळ्यात करायचा चोरी; असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

By

Published : Mar 23, 2021, 3:50 PM IST

Updated : Mar 24, 2021, 3:18 PM IST

मुंबई : फक्त उन्हाळ्यातच चोरी करणाऱ्या एका हंगामी चोराला लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केले आहे. मुळचा उत्तर प्रदेशातील असणारा हा चोर उन्हाळ्यातील तीन महिने चोरी करण्यासाठी मुंबईत यायचा. गेल्या 13 वर्षांपासून हंगामी चोरीचा त्याचा हा 'उद्योग' सुरू होता. एका चोरी प्रकरणाचा छडा लावताना दादर लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून चौकशीदरम्यान त्याच्या चोरीची ही अनोखी स्टाईल समोर आली आहे. सध्या त्याच्या हंगामी चोरीविषयीच जास्त चर्चा होताना दिसत आहे.

पोलीस अधिकाऱ्यांनी याची माहिती दिली

याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 18 मार्च 2021 रोजी जनशताब्दी एक्सप्रेसमध्ये पहाटे प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून एक चोरटा पळून गेला. याबद्दची तक्रार संबंधित महिलेने पोलिसांकडे केली होती. त्या तक्रारीनुसार पोलिसांकडून दादर रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असतात. एक अज्ञात चोर महिला प्रवाशाच्या गळ्यातील सोनसाखळी खेचून फलाटावर उडी मारून पळून गेल्याचे यात दिसून आले. यानंतर पोलिसांनी दादर रेल्वे स्थानकावरील संपूर्ण सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. त्यावरून अज्ञात चोराचा माग काढत पोलिसांनी त्याला जेरबंद केले.

24 तासांत केले जेरबंद

स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंबईतील संपूर्ण लॉज आणि रेस्टॉरंटमध्ये छापे टाकत त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अवघ्या २४ तासांत दादर लोहमार्ग पोलिसांनी या चोराला मुंबई सेंट्रलमधील एका लॉज मधून जेरबंद केले हे विशेष. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 12 टीम तयार केल्या होत्या अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घनवट यांनी दिली.

फक्त उन्हाळी चोरीचा 'उद्योग'

या चोरट्याचे नाव चकनलाल बाबुलाल सोनकर असून तो मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. गेल्या 13 वर्षांपासून मुंबईत फक्त उन्हाळ्यातील तीन महिने चोरी करण्यासाठी तो येत असे. उन्हाळ्यात लांब पल्याच्या गाड्यांमधून प्रवास करताना प्रवासी खिडक्या उघड्या ठेऊन प्रवास करतात. विशेषतः महिला उष्णतेमुळे खिडकीत बसून प्रवास करणे पसंत करतात. हीच संधी हेरून हा चोर या महिलांना लक्ष्य करत होता. महिला प्रवाशांचे दागिने खिडकीतून चोरून तो पसार व्हायचा. त्यानंतर पोलिसांना हूल देण्यासाठी तो दक्षिण मुंबईतील वेगवेगळ्या लॉजवर राहत असे. मुंबईत येताना आपला माेबाईलही तो गावीच ठेऊन यायचा. त्यामुळे पोलिसांच्या हाती न लागण्याचा त्याचा प्रयत्न यशस्वी व्हायचा.

हेही वाचा -नाशिकमध्ये महिला सावकाराची दंबंगिरी; आदिवासी दाम्पंत्यास अमानुष मारहाण

Last Updated : Mar 24, 2021, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details