महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गोव्यात दोन दिवसीय काजू परिषदेला सुरुवात - दोन दिवसीय काजू परिषदेला सुरुवात

भारत सरकारच्या काजू आणि कोको विकास संचालनालय, गोवा सरकारचे कृषी संचालनालय आणि गोवा राज्य फळबागायत प्राधिकरण यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन गोव्याचे कृषी सचिव कुलदीप गांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किनारी शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एकनाथ चाकुरकर, गोव्याच्या कृषी संचालनालयाचे सहाय्यक संचालक संजीव मयेकर, दत्तप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

गोव्यात दोन दिवसीय काजू परिषदेला सुरुवात
गोव्यात दोन दिवसीय काजू परिषदेला सुरुवात

By

Published : Feb 26, 2021, 7:24 PM IST

पणजी -देशात काजू बागायती, त्यावर आधारित उद्योग आणि बागायतदार यांच्यासमोरील 'आव्हाने आणि संधी' या विषयावर गोव्यात राष्ट्रीय काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मिरामार-पणजी येथील एका सभागृहात आज आणि उद्या (शनिवार) ही परिषद होणार आहे.

गोव्यात दोन दिवसीय काजू परिषदेला सुरुवात

भारत सरकारच्या काजू आणि कोको विकास संचालनालय, गोवा सरकारचे कृषी संचालनालय आणि गोवा राज्य फळबागायत प्राधिकरण यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन गोव्याचे कृषी सचिव कुलदीप गांगर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय किनारी शेती संशोधन संस्थेचे संचालक डॉ. एकनाथ चाकुरकर, गोव्याच्या कृषी संचालनालयाचे सहाय्यक संचालक संजीव मयेकर, दत्तप्रसाद देसाई आदी उपस्थित होते.

परिषदेविषयी माहिती देताना काजू आणि कोको विकास संचालनालयाचे संचालक डॉ. व्यंकटेश हुब्बळी म्हणाले, ''तंत्रज्ञान विकसित होत आहे. त्याबरोबर शेतकऱ्यांसमोर आव्हाने ही आहेत. यांचा सामना कसा करता येईल यावर विचारविमर्ष करण्यासाठी 19 राज्यांचा सहभाग असणारी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. परंतु, 11 राज्ये सहभागी झाली आहेत. यामध्ये सरकारचे अधिकारी, संशोधक, फळबागातदार, रोपवाटिका विक्रेते आणि शेतकरी यांचा सहभाग आहे. मागणी एवढी उत्पादन क्षमता नसल्याने कच्ची काजू बी आयात करावी लागत आहे. मागच्या वर्षी याकरिता 8 हजार 800 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यामुळे यावर गांभीर्याने विचार करण्यासाठी ही परिषद आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या समोरील अडचणी, कोणत्या भागात त संधी आहेत, क्षेत्र कोणत्या प्रकारे विस्तारता येईल. त्याबरोबर काजूचे पारंपरिक उत्पादक नसलेल्या राज्यात याच्या लागवडीसाठी काय करता येईल याचा विचार करण्यात येणार आहे.''

गोव्यात दोन दिवसीय काजू परिषदेला सुरुवात

डॉ. हुब्बळी पुढे म्हणाले, मागच्या वर्षी मध्यप्रदेशात जेथे आंबा उत्पादन होते अशा बेतूल, बालघाट आणि शिवनी जिल्ह्यात काजू लागवड करण्यात आली आहे. परंतु, गोव्यातील काजूची चव अन्य ठिकाणच्या उत्पादनाला नाही. जपानसारखे देश गोव्यातील काजूला पसंती देत असतात. या परिषदेत संशोधकांचाही सहभाग आहे. त्यांचे संशोधन आणि शेतकऱ्यांसमोरील अडचणी यावर चर्चा होणार आहे. देशभरात सध्या 11 हजार 30 लाख हेक्टर क्षेत्रात काजू लागवड असून 7 लाख 50 हजार हेक्टर क्षेत्रात उत्पादन होते. जेथे प्रत्यक्ष 17 लाख हेक्टर क्षेत्रातील उत्पादनाची गरज आहे. ही गरज भरून काढण्यासाठी आयातीवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे यावर येथे गांभीर्याने चर्चा होणार आहे.

तर, गोव्याचे सहाय्यक कृषी संचालक संजीव मयेकर यांनी सांगितले की, गोव्यात 57 हजार 400 हेक्टर क्षेत्रात काजू उत्पादन घेतले जाते. यासाठी वेंगुर्ला 4, 7 आणि 8 या वाणांवर भर दिला जातो. तसेच अलीकडे किनारी शेती संशोधन संस्थेने काजूची दोन वाणं विकसित केली आहेत. त्यांचीही लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. 20 वर्षांपूर्वी गोव्यात हेक्टर 150 किलोग्रॅम काजूचे उत्पादन होत असे, ते आता 507 किलोग्रॅमपर्यंत पोहोचले आहे. या परिषदेत अतिघन लागवडीवर चर्चा होणार आहे. ती कशी करता येईल आणि प्रत्यक्ष कशी उपयोगात आणता येईल यावर आम्ही चर्चा करणार आहोत.

या परिषदेला 11 राज्यातील काजू बागायतदार सहभागी झाले आहेत. त्यामध्ये गोव्यातील 15 काजू उत्पादकांचा सहभाग आहे.

हेही वाचा - भारताच्या वर्ल्डकपविजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

ABOUT THE AUTHOR

...view details