मुंबई -घाटकोपर येथील महापालिकेच्या राजावाडी रुग्णालयात 35 वर्षीय महिलेच्या पोटावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून 8 किलो वजनाचा मांसाचा गोळा काढला. आता ही महिला रुग्ण ठणठणीत असून पुढील काही दिवसांत काम सुद्धा करू शकणार आहे.
माहिती देताना रुग्ण आणि डॉक्टर हेही वाचा -Corona Update : रुग्ण, मृत्यूसंख्येत चढउतार सुरूच; मंगळवारी ५६०९ नवे रुग्ण, १३७ मृत्यू
वारंवार पोट दुखत असल्याने 35 वर्षीय ज्येष्ठ महिला रुग्णालयात आली. डॉक्टरांनी सर्व तपासण्या केल्यानंतर त्यांच्या पोटात मांसाचा गोळा असल्याचे निदान झाले. गोळा तब्बल 8 किलो वजनाचा असल्याचेही स्पष्ट झाले. डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. सुमारे दीड तास शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेने गोळा काढल्यानंतर रुग्ण महिलेने सुटकेचा निःश्वास टाकला.
ठाणे परिसरात राहणाऱ्या लता यादव यांना गेल्या तीन वर्षांपासून पोटात दुखत होते. त्यांनी हे दुखणे अंगावर काढले आणि पोटात मासाचा गोळा तयार झाला. यामुळे त्या गर्भवती महिलेसारख्या दिसू लागल्या. राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आल्या असता डॉक्टरांनी त्यांची सर्व वैद्यकीय चाचणी केली असता पोटात मासाचा गोळा आढळून आला.
लता यी घरकाम करतात, तर त्यांचे पती हे ठाणे पालिकेत ठेका पद्धतीवर स्वच्छतेच काम करतात. हे ऑपरेशन करण्यासाठी खूप पैसे लागेल म्हणून त्यांनी खासगी डॉक्टरांना ऑपरेशन करण्यास नकार दिला. पण, डॉक्टर अजय गुजर यांनी हे ऑपरेशन या रुग्णालयात मोफत होईल, असे संगितल्यावर त्यांनी होकार दिला. 5 ऑगस्टला डॉक्टर अजय गुजर आणि त्यांच्या चमूने साडेतीन तास ऑपरेशन करून 8 किलो वजनाचा मासाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला. लता यादव यांच्या चेहऱ्यावर आता हास्य दिसू लागले आहे, तर ज्या रुग्णांना अशी गाठ असल्यास त्यांनी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉ. अजय गुजर यांनी केले.
हेही वाचा -आघाडी सरकार देणार माहिती अन् तंत्रज्ञान क्षेत्रात राजीव गांधी यांच्या नावाने पुरस्कार