मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी नुकतीच जागतिक आर्थिक परिषद पार ( Davos World Economic Forum ) पडली. या परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले ( Foreign Investment In Maharashtra ) आहेत. यामाध्यमातून राज्यभरातील सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळणार असल्याचा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला.
दावोस येथील विविध सामंजस्य करारावेळी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, अतिरिक्त मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, सह मुख्य कार्यकारी अधिकारी पी. डी.मलिकनेर आदी उपस्थित होते.