मुंबई -वांद्रे परिसरात काल रात्री १२:३० च्या सुमारास तीन मजली इमारत ( Building collapsed in Bandra area in Mumbai ) कोसळली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना वांद्रे येथील शास्त्रीनगर भागातील आहे. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, ४ अग्निशमन दल, पोलीस, १ रुग्णवाहिका आणि महापालिकेचे पथक घटनास्थळी पोहोचले. मुंबई पोलिसांचे डीसीपी मंजुनाथ यांनी सांगितले की, एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सर्व सुरक्षित आहेत. हे सर्व लोक बिहारमधील मजूर आहेत. ढिगाऱ्याखाली ३ ते ४ लोक अडकल्याची शक्यता बीएमसीने व्यक्त केली आहे. बचावकार्य सुरू असल्याचे बीएमसीने सांगितले.
हेही वाचा -Maharashtra Monsoon Updates : येत्या २४ तासांत राज्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता
ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची शक्यता? -शास्त्रीनगरमध्ये वेस्टर्न एक्सप्रेस हायवेजवळ असलेल्या महाराष्ट्र नगरमध्ये ही इमारत होती. तळमजला अधिक दोन मजले असलेल्या या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 19 जण जखमी झाले आहेत. जखमींना वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच, ढिगाऱ्याखाली ३-४ जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून बचाव पथकाकडून शोधकार्य सुरू आहे.
एका व्यक्तीचा मृत्यू, १६ गंभीर जखमी -घटनेबाबत माहिती देताना डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास वांद्रे येथील शास्त्रीनगर भागात तीन मजली इमारत कोसळली. तळमजल्यावरील सर्व नागरिक सुखरूप असून, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील व्यक्तींना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व बिहारमधून आलेले मजूर आहेत.