मुंबई - मध्य रेल्वेने १२ सप्टेंबरपासून मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून १२ सप्टेंबरपासून दररोज ६ वाजून १५ मिनिटांनी सुटेल आणि मनमाडला त्याच दिवशी १० वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल.
मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे धावणार - मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे
०२११० असा या रेल्वेचा गाडीक्रमांक असणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव येथे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीत १७ द्वितीय आसन श्रेणी , ३ वातानुकूलित चेअर कार असणार आहे. या विशेष रेल्वेची बुकिंगची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
मुंबई ते मनमाड दरम्यान विशेष रेल्वे धावणार
०२११० असा या रेल्वेचा गाडीक्रमांक असणार आहे. या गाडीला दादर, कल्याण, देवळाली, नाशिक रोड, निफाड, लासलगाव येथे थांबे देण्यात आले आहेत. या गाडीत १७ द्वितीय आसन श्रेणी , ३ वातानुकुलित चेअर कार असणार आहे. या विशेष रेल्वेची बुकिंगची तारीख लवकरच जाहीर केली जाईल.
प्रवाशांनी बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोरोनाशी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.