मुंबईबीड जिल्ह्यातील बक्करवाडी येथील महिलेच्या अवैध गर्भपातामुळे Illegal abortion झालेल्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक Special Investigation Team नियुक्त करण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत Health Minister Dr. Tanaji Sawant यांनी विधानसभेत सांगितले.
चौकशीसाठी विशेष पथक?बीड जिल्ह्यात बक्करवाडी येथे शितल गणेश गाडे या महिलेचा गोठ्यामध्ये अवैधरीत्या केलेल्या गर्भपतामुळे Illegal abortion जून 2022 मध्ये तिचा मृत्यू Death due to illegal abortion झाला. या प्रकरणी आज विधानसभा
सदस्य लक्ष्मण पवार, डॉ भारती लव्हेकर, नमिता मुंदडा यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली आहे. यासाठी विशेष तपास पथक नेमण्याचे ही त्यांनी सांगितलं.
अहवाल १५ दिवसात येणारबक्करवाडी प्रकरणात Bakkarwadi abortion case सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याप्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात येईल. बीड जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्रांची पीसीपीएनडीटी कायद्यातील तरतुदीनुसार तपासणी करण्यात येईल. या तपासणीत दोषी आढळणाऱ्या सोनोग्राफी केंद्रांवर कारवाई केली जाईल, असे डॉ.सावंत यांनी सांगितले.
सहा आरोपींना अटकया प्रकरणातील दोषीविरुद्ध महाराष्ट्र प्रसुती पूर्व गर्भलिंग निदान तंत्र वापर नियम अधिनियम १९८८ व वैद्यकीय गर्भपात अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल केला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सदर ६ आरोपी विरुद्ध प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालय, गेवराई, जिल्हा बीड या न्यायालयात खटला दाखल करण्यात आलेला असून सद्य स्थितीत हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचेही सावंत यांनी सांगितले. तसेच हा अहवाल पंधरा दिवसात येणार असून हे प्रकरण फास्टट्रॅकवर चालवले जाणार असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
हेही वाचाFather Murdered Children पत्नीवर संशय घेत पतीने केली दोन मुलांची निर्घृण हत्या, आत्महत्येचाही केला प्रयत्न