महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Sanjay Raut On Mahatma Gandhi : "...तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिनांना गोळ्या घातल्या असत्या" - संजय राऊत मोहम्मद अली जिना

पाकिस्तानची निर्मिती ही मोहम्मद अली जिना यांची ( Sanjay Raut On Muhammad Ali Jinnah ) मागणी होती. जर खरे हिंदुत्ववादी असते तर त्यांनी गांधींना ( Sanjay Raut On Mahatma Gandhi ) नव्हे तर जिना यांना गोळ्या घातल्या असत्या.

Sanjay Raut
Sanjay Raut

By

Published : Jan 30, 2022, 10:37 AM IST

Updated : Jan 30, 2022, 2:31 PM IST

मुंबई -पाकिस्तानची निर्मिती ही मोहम्मद अली जिना यांची मागणी ( Sanjay Raut On Muhammad Ali Jinnah ) होती. जर खरे हिंदुत्ववादी असते तर त्यांनी गांधींना नव्हे तर जिना यांना गोळ्या घातल्या असत्या. हे देशभक्तीचे कृत्य ठरले असते. गांधीजींच्या निधनावर आजही जग शोक व्यक्त करीत आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली ( Sanjay Raut On Mahatma Gandhi ) आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राहुल गांधी यांनी आजच्याच दिवशी हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींची हत्या केली होती, असे ट्वीट केले आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, मर्दानगी होती, तर गांधींना का मारल, जिनांना का मारले नाही. वेगळ्या पाकिस्तानची मागणी जिनांनी केली होती. जर गोळी मारणारा खरा हिंदुत्ववादी होता आणि त्याच्यात हिम्मत होती, तर फाळणीला कारणीभूत असलेल्या जिनांवर गोळी झाडायला हवी होती, नि:शस्त्र गांधींवर का गोळी झाडण्यात आली, असा सवाल राऊतांनी केला.

शिवसेनेच्या उमेदवाराचे अर्ज रद्द

शिवसेना पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढत आहे. मात्र, आतापर्यंत आमच्या 5 ते 6 उमेदवारांचे अर्ज बेकायदेशीपणे रद्द करण्यात आले आहे. माझ्याकडे याबाबत पुरावे आहे की 3 वाजेपुर्वी अर्ज दाखल केले होते. तरीसुद्धा आमच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले आहे. भाजपाचे अर्ज चुकासहीत स्वीकारले आहेत. गोव्यातही हाच प्रकार सुरु आहे. आमच्यामुळे एकतर त्यांचा पराभव होईल अथवा आम्हा जिंकू, म्हणूनत उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला आमची भिती वाटत असल्याचेही राऊत यांनी सांगितले.

हेही वाचा -लैलासाठी मजनुने जेवढा मार खाल्ला नसेल, तेवढा मार तरुण बेरोजगारीमुळे खात आहेत, नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

Last Updated : Jan 30, 2022, 2:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details