मुंबई - बोरिवलीतील आर एम भट्ट रोडवर काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला दिवसभर फुगे विकून रात्री बाळाला दूध पाजताना एका मातेवर काळाने घाला घातला. भरधाव कार चालकाने या मातेला अक्षरशः चिरडले तर तिचे बाळ अपघातात जखमी झाले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत. कारचालक फरार झाला असून त्याचा बोरिवली पोलीस तपास करत आहेत.
भरधाव कारने आईसह बाळाला चिरडले, आईचा मृत्यू तर बाळ जखमी - Road accident in Borivali
बोरिवलीतील आर एम भट्ट रोडवर काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. रस्त्याच्या कडेला दिवसभर फुगे विकून रात्री बाळाला दूध पाजताना एका मातेवर काळाने घाला घातला. भरधाव कार चालकाने या मातेला चिरडले तर तिचे बाळ अपघातात जखमी झाले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
भरधाव कार चालकाने या मातेला अक्षरशा चिरडले
बोरिवली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. लवकरच कारचालकाचा शोध घेण्यात येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. मात्र अशा हिट एन्ड रनच्या केसेस आधीही घडल्याने या घटनेने पुन्हा जखमांची आठवण करून दिली आहे. ही घटना 2 फेब्रवारीला घडली असून 7 तारखेला हॉस्पिटलमध्ये वाचलेल्याचा मृत्यू झाला.
Last Updated : Feb 8, 2022, 8:48 AM IST