मुंबई -वर्सोवा परिसरात 17 वर्षीय अल्पवयीन मोलकरणीसोबत गैरवर्तन केल्याची घटना (Minor Maid Beaten Brutally in Versova ) समोर आली आहे. वर्सोवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी विघ्नेश्वर हाईट्स अंधेरी पश्चिम परिसरात वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेव्हा मोलकरणीला तिचे काम पूर्ण करण्यास उशीर झाला. तेव्हा आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तिला स्वत:चे कपडे काढण्यास भाग पाडले आणि नंतर तिचे व्हिडिओ आणि फोटो काढले. आरोपीने पीडितेला चप्पलने मारले ज्यामुळे पीडितेच्या डोक्याला जखमा झाल्या.
घरी गेल्यावर पीडित अल्पवयीन मुलीच्या बहिणीला तिच्या अंगावर जखमेच्या खुणा दिसल्या तेव्हा तिने याबाबत विचारणा केली असता पीडितेने घडलेला प्रकार सांगितला. घटनेनंतर पीडितेने जवळचे पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली.