मुंबई - आज मध्य रेल्वेवर डोंबिवली स्थानका दरम्यान एका व्यक्तीने आत्महत्या केली. यामुळे अचानक मुंबईकडे जाणाऱ्या लोकल थांबवाव्या लागल्या. त्यामुळे मागून येणाऱ्या सर्व लोकल उशिराने धावत आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल या दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावत आहेत.
रेल्वे मार्गावर एका व्यक्तीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिरा धावणार - छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल
आज मध्य रेल्वेवर डोंबिवली स्थानका दरम्यान एका व्यक्तीने आत्महत्या केली. यामुळे अचानक मुंबईकडे जाणाऱ्या लोकल थांबवाव्या लागल्या. त्यामुळे मागून येणाऱ्या सर्व लोकल उशिराने धावत आहेत. याचा परिणाम म्हणून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल या दहा ते पंधरा मिनिटांनी उशिरा धावत आहेत.
मुंबईकडे धावणारी लोगल
सकाळी कामावर जाण्याच्या वेळेला डोंबिवलीकडून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल खाली एका व्यक्तीने लोकल रेल्वेच्या पुढे येऊन आत्महत्या केली.
अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रेल्वे कर्मचाऱ्यांची आणि प्रवाशांची तारांबळ उडाली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी आणि आरपीएफ यांनी हा प्रसंग सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.