महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Meeting On Silver Oak : सरकार टिकवण्यासाठी कायदेशीर लढाई; सिल्वर ओकवर बैठक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. दोन्ही बाजूनी आता कायदेशीर मार्गाचा अवलंब (A legal battle to sustain the government) केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली आज शिवसेना, काँग्रेस नेत्यांची बैठक (Meeting of Shiv Sena Congress leaders) झाली. कायदेशीर बाबींवरआजच्या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचे समजते.

Meeting on Silver Oak
सिल्वर ओकवर बैठक

By

Published : Jun 26, 2022, 12:43 PM IST

मुंबई:नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंड केल्याने सरकार अल्पमतात आले आहे. शिंदे गटावर शिवसेनेने कारवाईचा इशारा दिला आहे. निलंबनाची कारवाई झाल्यास शिंदे गट कायदेशीर लढाई लढणार आहे. कायदेशीर पेच निर्माण झाल्यास सरकार टिकवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आज शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. दरम्यान, झालेल्या बैठकीत शरद पवारांनी शिवसेना कायदेशीर प्रक्रिया कशी पार पाडत आहे, याची माहिती अनिल देसाई आणि परब यांनी शरद पवार यांना दिली. एकनाथ शिंदे गट नेता आणि १६ आमदार निलंबन यासाठी कायदेशीर मुद्दे कोर्टात कोणते मांडणार याचा आढावा पवार यांनी घेतला.

ही लढाई कायदेशीरपद्धतीने लढायला हवी आणि कोर्टात कोणते आणि कसे मुद्दे मांडता येतील यावर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. शरद पवारांच्या भेटीला शिवसेना, काँग्रेसचे नेते आले होते. भेटायला आलेल्या पैकी एकही नेता न बोलताच बाहेर पडले. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात सिल्व्हर ओकवरून काहीही न बोलता निघाले. शिवसेना नेते अनिल देसाई, अनिल परबही न बोलताच निघाले. मात्र महाविकास आघाडी भक्कम राहील, कोर्टात ही भूमिका व्यवस्थितीत राहील असा सल्ला शरद पवार यांनी महाविकास आघाडी नेत्याना दिल्याचे समजते.

हेही वाचा :Equation Of Power Before Governor : राज्यपाल कोविड मुक्त, राजभवनात राजकीय समीकरणे ठरणार?

ABOUT THE AUTHOR

...view details