मुंबई -संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी 107 जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या त्या बलिदानाची आठवण आणि त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला कायम लक्षात राहावे, म्हणून हुतात्मा स्मारकाला आदरांजली वाहिली जाते. मुंबईत विविध ठिकाणी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली गेली. मानखुर्द येथेही सांयकाळी एका स्वयंसेवी संस्थेने 107 दिवे लावून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.
मानखुर्दमध्ये 107 दिवे लावून हुतात्म्यांना श्रद्धांजली... हेही वाचा... नाशिकच्या कांद्याची विक्रमी दरवाढ, किरकोळ बाजारात कांदा ऐंशीच्या घरात
मुंबईत फ्लोरा फाऊंटन येथे हुतात्मा स्मारक 21 नोव्हेंबर 1961 रोजी उभारण्यात आले. या ठिकाणी 21 नोव्हेंबरला हुतात्म्यांना आदरांजली वाहिली जाते. महाराष्ट्रभर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला. मुंबईत विविध ठिकाणी या हुतात्म्यांना श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित केले जातात. मानखुर्द येथे स्वयंसेवी संस्थेने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गुरुवारी संध्याकाळी 107 दिवे लावून आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
हेही वाचा... बळीराजाचा आक्रोश : सोयाबीन गेलं; आता कपाशीही जाण्याच्या मार्गावर, यंदा जगावं तरी कसं
हुतात्मा दिनाचा इतिहास....
२१ नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस आहे. 21 नोव्हेंबर १९५६ या दिवशी मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या परिसरात तणावाचे वातावरण होते. कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले, त्यामुळे मराठी जनता संतापली. सर्वत्र छोट्या-मोठ्या सभांमधून या निर्णयाचा निषेध होत होता. या संगठनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाऊंटनासमोरील चौकात येण्याचे नियोजन झाले. त्यानंतर प्रचंड जनसमुदाय एका बाजूने चर्चगेट स्थानकाकडून व दुसऱ्या बाजूने बोरीबंदरकडून गगनभेदी घोषणा देत, फ्लोरा फाउंटनकडे जमला. मोर्चा पोलिसी ताकद वापरून उधळून लावण्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला. मात्र अढळ सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले आणि पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला. त्यावेळी गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ आंदोलक हुतात्मे झाले. या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे व मराठी माणसाच्या आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन १ मे, इ.स. १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली. त्यानंतर १९६५ मध्ये त्या ठिकाणी हुतात्मा स्मारकाची उभारणी करण्यात आली. तसेच राज्यात 21 नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.
हेही वाचा... प्रशासनाने काश्मीरवरील निर्बंधांबाबत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यावे - सर्वोच्च न्यायालय