मुंबई -मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज गोंधळाचे वातावरण आहे. दुर्गा पूजेला घरी जाणाऱ्या लोकांमुळे विमानतळावर मोठी गर्दी जमली आहे. यावेळी विमानतळ गर्दीच्या रेल्वे स्टेशनसारखे दिसत आहे.
मुंबई विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे, जिथे आज सकाळी एक आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळाले.
खरं तर विमानतळावर तुरळक गर्दी व शिस्तीचे वातावरण असते. मात्र आज मुंबई विमानतळावर प्रचंड गर्दी होती. आतमध्ये चेंगराचेंगरी होत होती व सर्वत्र गोंधळाचे वातावरण होते. दरम्यान, प्रवाशांनी उड्डाण चुकल्याबद्दल व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. असे सांगितले जात आहे की, विमानतळावर लोक लांब रांगेत अडकले होते. दुसरीकडे, देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोने प्रवाशांना सुरक्षा तपासणीसाठी पुरेसा वेळ देण्यासाठी लवकर चेक इन करण्याचा सल्ला दिला आहे.