महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

दंडात्मक कारवाई  : मास्क न वापरणाऱ्या ३३ लाख मुंबईकरांकडून ६६ कोटींचा दंड वसूल

मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी मास्क लावण्याचे तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन केले. पालिकेने वारंवार आवाहन करूनही नागरिक मास्क लावत नसल्याने एप्रिल २०२० पासून पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२० ते ७ ऑगस्ट २०२१ या ५२५ दिवसांत महापालिका, रेल्वे आणि मुंबई पोलीस यांनी ३३ लाख १९ हजार ५८७ लोकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख ३८ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे.

By

Published : Sep 9, 2021, 6:03 AM IST

Mumbaikars
मुंबईकरांकडून ६६ कोटींचा दंड वसूल

मुंबई - मुंबईत गेले दीड वर्ष कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान पालिकेने नागरिकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्क न घालता फिरत आहेत. अशा नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पालिकेने गेल्या ५२५ दिवसांत ३३ लाख नागरिकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या २७ लाख नागरिकांवर कारवाई करत ५५ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

३३ लाख नागरिकांवर कारवाई-
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा प्रसार सुरू झाला. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने नागरिकांनी मास्क लावण्याचे तसेच रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये असे आवाहन केले. पालिकेने वारंवार आवाहन करूनही नागरिक मास्क लावत नसल्याने एप्रिल २०२० पासून पालिकेने कारवाई करण्यास सुरुवात केली. एप्रिल २०२० ते ७ ऑगस्ट २०२१ या ५२५ दिवसांत महापालिका, रेल्वे आणि मुंबई पोलीस यांनी ३३ लाख १९ हजार ५८७ लोकांवर कारवाई करत ६६ कोटी ७८ लाख ३८ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे.

संयुक्त कारवाई -
मुंबई महानगरपालिकेकडून २८ लाख ०७ हजार ३९८ लोकांवर कारवाई करत ५६ कोटी ५१ लाख ३९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून ४ लाख ८८ हजार २९८ लोकांवर कारवाई करत ९ कोटी ७६ लाख ५९ हजार ६०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेकडूनही कारवाई करण्यात आली असून २३ हजार ८९१ लोकांवर कारवाई केली तर यातून ५० लाख ३९ हजार २०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

थुंकणाऱ्यांकडूनही दंड वसूल -
रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांकडूनही महापालिकेने दंड वसूल केला आहे. मुंबईतील सर्व विभागातून २७ हजार ७९८ लोकांवर कारवाई करत ५५ लाख ४८ हजार ३०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details