महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मास्क न घालणाऱ्या मुंबईकरांकडून आतापर्यंत ५५ कोटी ५६ लाखांच्या दंडाची वसुली - मुंबई लेटेस्ट न्यूज

मुंबईमध्ये गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. आतापर्यंत अशा तब्बल २७ लाख ५८ हजार ६४९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

विनामास्क नागरिकांना दंड
विनामास्क नागरिकांना दंड

By

Published : May 24, 2021, 4:41 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेल्या वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. हा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे नागरिक मास्क घालत नाहीत अशा नागरिकांकवर पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे. मात्र त्यानंतरही अनेक नागरिक मास्कचा वापर करत नसल्याचे निदर्शनास येत आहे. विनामास्क नागरिकांवर महापालिका, क्लिनअप मार्शल तसेच पोलीसांकडून कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत एकूण २७ लाख ५८ हजार ६४९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून तब्बल ५५ कोटी ५६ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

विनामास्क नागरिकांवर कारवाई

बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार व प्रादुर्भाव आटोक्यात आणण्याकरिता मार्च २०२० पासून विविध उपाययोजना वेळोवेळी नागरिकांच्या हितासाठी अमलात आणलेल्या आहेत. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सर्वोत्तम उपाय म्हणजे नागरिकांनी मास्क वापरणे आवश्यक आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी विनामास्क घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांना २०० रुपये दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीत विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर अधिकाधिक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, २० एप्रिल २०२० पासून कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण २७ लाख ५८ हजार ६४९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, त्यातून ५५ कोटी ५६ लाख २१ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालिकेची कारवाई

मुंबई महापालिकेने आतापर्यंत २३ लाख ९६ हजार २४९ नागरिकांवर कारवाई केली आहे. या कारवाईमधून ४८ कोटी २८ लाख ८० हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे.

पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी ३ लाख ३८ हजार ५०९ नागरिकांवर कारवाई करत ६ कोटी ७७ लाख १ हजार ८०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. पोलिसांनी जो दंड वसूल केला आहे, त्यापैकी ५० टक्के दंड पोलीस विभागाला तर ५० टक्के दंड महापालिकेला दिला जाणार आहे.

रेल्वे विभागाची कारवाई

फेब्रुवारीपासून मुंबईमध्ये सर्वसामान्य नागरिकांना रेल्वेमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. तेव्हापासून मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या विनामास्क प्रवाशांवर रेल्वे विभागाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत रेल्वे प्रशासनाकडून २३ हजार ८९१ प्रवाशांवर कारवाई करण्यात आली असून, ५० लाख ३९ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

कारवाई नंतर मास्क मोफत

मास्क न लावता किंवा अयोग्य रीतीने लावून फिरणाऱ्या नागरिकांना मास्कची आवश्यकता देखील समजावून सांगितली जात आहे. मास्क नसल्यास दंड केल्यानंतर संबंधित नागरिक पुन्हा विनामास्क पुढे जातात. त्यामुळे मास्क वापराच्या उद्दिष्टांची पूर्तता व्हावी, यासाठी दंड करण्यासोबत संबंधित नागरिकास एक मास्क देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मोफत पुरविला जात आहे. मास्क मोफत दिल्याची नोंद संबंधित दंडाच्या पावतीवर देखील केली जात आहे.

झोननिहाय कारवाई

झोन व्यक्ती दंड रुपये
झोन १ - 3,39,391 - 6,84,48,700
झोन २ - 4,25,674 - 8,54,66,900
झोन ३ - 3,21,927 - 6,56,71,000
झोन ४ - 3,96,210 - 7,97,87,400
झोन ५ - 2,71,489 - 5,45,14,500
झोन ६ - 2,97,716 - 5,95,87,800
झोन ७ - 3,43,842 - 6,94,04,500
एकूण - 27,58,649 - 55,56,21,800

ABOUT THE AUTHOR

...view details