महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

डंपरखाली येऊन दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू - मुंबई डंपरखाली येऊन दाम्पत्याचा जागीच मृत्यू

मृत दाम्पत्य फिल्म इंडस्ट्रीमधील मेकअप आर्टिस्ट आहेत. ते मीरा रोड येथील शूटिंगच्या सेटवर जात होते. हा अपघात खड्ड्यामुळे झाला की डंपर चालकाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांनी एफआयआर नोंदवून डंपर चालकाला अटक केली आहे.

a couple who riding a bike died on spot after coming under the dumper in mumbai
डंपरखाली येऊन दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्याचा जागीच मृत्यू

By

Published : Aug 19, 2022, 7:35 AM IST

मुंबईबोरिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर बुधवारी दुपारी दीड वाजता तरुण आणि तरुणीचा डम्परखाली येऊन अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली असून डंपर चालकाला अटक करण्यात आली आहे. सलीम शेख असे आरोपी डंपर चालकाचे नाव आहे.

खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोपअंधेरीहून मीरा रोडच्या दिशेने एक जोडपे दुचाकीवरून जात होते, तेव्हा त्यांना डंपरने मागून धडक दिली. त्यानंतर दोघेही डंपरखाली आले. या अपघातात तरुण आणि तरुणी दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, अपघातानंतर स्थानिक लोक आणि मनसेने पश्चिम द्रुतगती महामार्गावरील खड्ड्यामुळे हा अपघात झाल्याचा आरोप केला आहे. सध्या हा अपघात खड्ड्यामुळे झाला की डंपरच्या धडकेमुळे झाला का याचा तपास आता कस्तुरबा मार्ग पोलीस करत असून पोलिसांनी डंपर चालकालाही अटक केली आहे. नजीर शाह, छाया खिलारे असे मृताचे नाव असून दोघेही 43 वर्षांचे असून, मरोळ येथील रहिवासी आहेत.


डंपर चालकाला अटक मृत दोघेही फिल्म इंडस्ट्रीमधील मेकअप आर्टिस्ट आहेत आणि मीरा रोड येथील शूटिंगच्या सेटवर जात होते, दोघीही पत्नी आहेत. हा अपघात खड्ड्यामुळे झाला, की डंपर चालकाच्या चुकीमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या पोलिसांनी एफआयआर नोंदवून डंपर चालकाला अटक केली आहे. चालकाने पोलिसांना सांगितले की, अचानक दुचाकी गाडीच्या बाजू खाली आली होती.

ABOUT THE AUTHOR

...view details