महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aditya Pancholi : अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणी वाढल्या.. मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - आदित्य पांचोलीची सॅम फर्नांडिसला मारहाण

सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या अभिनेता आदित्य पांचोलीच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. त्याच्याविरोधात मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली ( Case filed against Aditya Pancholi ) आहे. सॅम फर्नांडिस या चित्रपट निर्मात्याने ही तक्रार दिली ( Aditya Pancholi beats up Sam Fernandes ) आहे.

आदित्य पांचोली
आदित्य पांचोली

By

Published : Feb 9, 2022, 3:24 PM IST

Updated : Feb 9, 2022, 4:17 PM IST

मुंबई : अभिनेता आदित्य पांचोलीविरोधात मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात ( Juhu Police Station ) तक्रार दाखल करण्यात आली ( Case filed against Aditya Pancholi ) आहे. आदित्य पांचोली सातत्याने वादाच्या भोवऱ्यात राहिलेला आहे. यापूर्वीही त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

सॅम फर्नांडिसला मारहाण

दरम्यान, सॅम फर्नांडिस या चित्रपटाच्या निर्मात्याने आदित्य पांचोलीवर शिवीगाळ, धमकी आणि मारहाण केल्याचा आरोप केला ( Aditya Pancholi beats up Sam Fernandes ) आहे. मुंबईतील जुहू परिसरात असलेल्या सन अँड सँड हॉटेलमध्ये ही घटना घडली. आदित्य पांचोली आणि चित्रपट निर्माता सॅम फर्नांडिस यांच्याविरुद्ध मुंबईतील जुहू पोलीस ठाण्यात क्रॉस तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

कंगनासोबतही झाले होते वाद

आदित्य पांचोली कायमच विवादात राहिला आहे. यापूर्वी अभिनेत्री कंगना राणावत सोबतही त्याचे वाद झाले ( Aditya Pancholi Vs Kangana Ranaut ) होते. आदित्यने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचाही आरोप कंगनाने केला होता. तसेच कंगनाची बहिणीने पांचोलीच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता. यासह 2004 ते 2009 या दरम्यान आदित्य पंचोली याने एका महिलेला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कर केल्याचाही गुन्हा त्याच्यावर दाखल होता.

Last Updated : Feb 9, 2022, 4:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details